Ribandar-Chimbel Junction
Ribandar-Chimbel Junction Dainik Gomantak
गोवा

Ribandar-Chimbel Junction : उड्डाणपुलासाठी आणखी दीड वर्षाचा कालावधी!

दैनिक गोमन्तक

पणजी : रायबंदर-चिंबल जंक्शन येथे जीवघेण्‍या अपघातांचे सत्र सुरूच आहे. विशेष म्‍हणजे सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस खात्यांकडून उपाययोजना करूनही अपघात होत असल्याने चिंता वाढली आहे. त्‍यासाठी येथील नियोजित उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी कंत्राटदाराला केली असली तरी या पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान दीड वर्षाचा कार्यकाळ जाणार आहे.

अपघातांना आळा बसावा यासाठी जंक्शनवर सिग्नल बसविण्‍यात आले आहेत. तसेच अधिक खबरदारी म्हणून उतरणीवर तीन ठिकाणी रँबलर्स घालण्यात आले आहेत. रस्त्याच्या बाजूला उतरणीच्या सुरुवातीपासून गती मर्यादित ठेवणे व अपघात क्षेत्र असल्याचे सूचनाफलकही लावले आहेत. परंतु पहाटे आणि रात्री उशिरा सिग्नल तोडून वाहने बेफाम हाकण्‍याचे प्रकार घडत आहेत. खासकरून मालवाहू ट्रक आणि बसेस यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जातेय.

तेथील रँबलर्सचा जास्त काही फायदा होत नसल्याचे दिसून येते. कारण अवजड वाहन अतिवेगाने हे रँबलर्स पार करतात. शिवाय बहुतांश वाहने रँबलर्स चुकवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जातात. त्यासाठी या ठिकाणी बॅरिकेड्‌स घालणे आवश्‍यक आहे. दरम्‍यान, सूचनाफलक लावलेल्या ठिकाणी झाडे वाढल्‍याने ते वाहनचालकांना दिसत नाहीत. त्‍याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

रायबंदर-चिंबल जंक्शन येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास किमान दीड वर्ष लागणार आहे. हा पूल वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. परंतु पूर्वी बांधलेल्या खांबांचे चाचणी परीक्षण केले जाणार असून तेथे काही दोष आढळून आल्यास पुन्हा त्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे. हे काम लवकर पूर्ण झाल्यास 2023 पर्यंत उड्डाणपूल पूर्ण होईल, अन्‍यथा 2024च्या सुरुवातीला.

- दिनेश गुप्ता, मुख्य अभियंता (रस्ता विभाग, साबांखा)

रायबंदर-चिंबल जंक्शन हे धोक्याचे ठिकाण बनले असून येथे रँबलर्स टाकण्यात आले आहेत. परंतु भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ते पुरेसे नाहीत. त्यासाठी या ठिकाणी गतिरोधकांची आवश्‍यकता आहे. गतिरोधक मोठ्या आकाराचे असल्यास अवजड वाहनांचा वेग कमी करण्यास फायदेशीर ठरणार आहे. तसेच येथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही नावापुरतेच आहेत. त्यांचा योग्‍य वापर होणे आवश्‍यक आहे.

- कर्नल मिलिंद प्रभू, रस्ताकाम तज्ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT