Goa Accidental Death
Goa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: बेतोड्यातील महिलेसाठी स्पीडब्रेकर ठरला यमदूत! उपचारादरम्यान मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Accidental Death: गोव्यातील वाढत्या अपघातांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. वाहतूक विभागातर्फे वारंवार वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येतो. याबाबत स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही वाहनचालकांना बेदरकारपणे वाहन चालवण्याबाबत फटकारले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उसगांव येथे रविवारी रात्री एका कारची दोन खांबाला जोरदार धडक बसली. यामध्ये कारचालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.

तर दुसरीकडे, 15 एप्रिल रोजी बेतोडा येथे एक अपघात घडला. यात एक महिला रस्त्यावरील गतिरोधकावर पडून गंभीर जखमी झाली होती. बालकिश केदार शेख (वय 42) असे या महिलेचे नाव आहे. स्कूटरवरुन जात असताना गतिरोधकावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर बांबोळी येथे उपचार घेत असता सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दोनापावला - बांबोळी मार्गावर रविवारी पहाटे मोठा अपघात झाला आहे. मालवाहू ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला असून, ट्रकचा चक्काचूर झाला आहे.

पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT