Goa Accidental Death at Verna Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात वाढ! वेर्णा येथे ट्रकच्या धडकेत कारचालकाचा दुर्दैवी अंत

एक ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक

Goa Accidental Death at Verna: गोव्यातील अपघातांचे प्रमाण काही कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज (रविवारी) सकाळी झालेल्या अपघातात एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वेर्णा येथे हा अपघात घडला आहे. एक ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, ट्रक आणि कारमध्ये झालेल्या धडकेत कारचालक (मॅकआर्थर परेरा, 23, उतोर्डा) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

गोव्यातील वाढते अपघात हे सध्या डोकेदुखीचे कारण बनले आहे. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये अपघातांचे आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहतूक विभाग अधिकच सतर्क झाला असून वाहनचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. गवंडाळी येथील जंक्शनवर शुक्रवारी सकाळी 9.30वा. टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सांतइस्तेव येथील पोलिस कर्मचारी प्रदीप परब हे जागीच ठार झाले, तर मागे बसलेली त्यांची पत्नी जखमी झाली.

विशेष म्हणजे, प्रदीप यांनी हेल्मेट घातले होते; परंतु टेम्पोच्या धडकेने ते खाली पडले आणि डोके रस्त्यावर आपटून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT