Mann Ki Baat@100 : 100व्‍या ‘मन की बात’साठी 100 रेडिओ संच प्रदान!

सावर्डेत अनोखा उपक्रम : आमदार गणेश गावकर यांची अफलातून कल्‍पना; सर्वत्र चर्चा आणि कौतुक
Distributed 100 Radio to people of Sanvordem Constituency
Distributed 100 Radio to people of Sanvordem ConstituencyDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम आज रविवार 30 एप्रिलला होणार आहे. त्‍यासाठी सावर्डेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी आपल्‍या मतदारसंघात 100 रेडिओ संच प्रदान केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते हे संच सर्वसामान्यांना वितरित करण्‍यात आले.

दाभाळ येथील श्री पिसानी सातेरी सभागृहात आज शनिवारी झालेल्‍या या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, भाजप प्रभारी प्रभाकर गावकर, सावर्डे सरपंच चिन्मयी नाईक, साकोर्डा सरपंच प्रिया खांडेपारकर, कुळे सरपंच गोविंद शिगावकर, काले सरपंच नरेंद्र गावकर, भाजप गट मंडळ अध्यक्ष विलास देसाई, सचिव मच्छिंद्र देसाई, गुरु गावकर, उपसरपंच कालिदास गावकर, मोले सरपंच कपिल नाईक, भाजप सरचिटणीस शिरीष देसाई तसेच भाजपचे पदाधिकारी, ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

Distributed 100 Radio to people of Sanvordem Constituency
Ramesh Tawadkar : संबंधितांचे बेकायदा व्यवहार बंदीमुळेच आरोप

आमदार गावकर म्हणाले की, "भाजपच्‍या माध्यमातून लोकसेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. सावर्डे मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल सुरू आहे."

"नागरिकांचे सहकार्य मिळत आहेच, पण त्यात वाढ व्हावी असे सांगताना पंतप्रधानांची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी एक अभिनव कल्पना आपल्या डोक्यात आली आणि त्यातूनच हे शंभर रेडिओ मोफत प्रदान करण्यात आले."

दरम्‍यान, सदानंद शेट तानावडे व विनय तेंडुलकर यांनी आमदार गणेश गावकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. शिरीष देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Distributed 100 Radio to people of Sanvordem Constituency
Goa Police : वाळपईचे निरीक्षक प्रज्योत फडते निलंबित; लैंगिक अत्याचाराची दखल न घेतल्याने कारवाई

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचावा यासाठी आमदार गणेश गावकर यांनी 100 रेडिओ संच उपलब्ध करून दिले आहेत. राज्‍यात प्रथमच अशा प्रकारचा प्रशंसनीय उपक्रम आयोजित करण्‍यात आला."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यापर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविणार असून ते निश्‍चितच या उपक्रमाचे आणि आमदार गणेश गावकर यांचे कौतुक करतील."

सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com