Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वेर्णा अन् फोंडा बनले अपघातांचे हॉटस्‍पॉट; मागील पाच महिन्‍यांतली धक्कादायक आकडेवारी समोर

मागील पाच महिन्‍यांत 49 जणांचा मृत्‍यू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident औद्योगिक क्षेत्र नावारूपाला येणारी वेर्णा आणि फोंडा ही ठिकाणे अपघातांचे हॉटस्‍पॉट बनू लागली आहेत. यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्‍यांत दक्षिण गाेव्‍यात एकूण 49 जणांचा रस्‍ते अपघातांत मृत्‍यू झाला. त्‍यातील 18 जणांचे मृत्‍यू या दोन्‍ही शहरांतील आहेत.

वेर्णा व फोंडा या पोलिस स्‍थानकांच्‍या अखत्‍यारित मागच्‍या पाच महिन्‍यांत प्रत्‍येकी 9 बळी गेले आहेत. त्‍यानंतर कुंकळ्‍ळी पोलिस स्‍थानकाचा क्रमांक लागतो. पाच महिन्‍यांत या पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत सहा जणांचे बळी गेेले आहेत.

ही तिन्‍ही ठिकाणे औद्योगिक वसाहतींना जोडली गेली आहेत. 2022 साली संपूर्ण वर्षात दक्षिण गोव्‍यात 90 जणांचे रस्‍ते अपघातांत बळी गेले होते. ते प्रमाण पाहता यावर्षी पाचच महिन्‍यांत हे प्रमाण बरेच वाढल्‍याचा निष्‍कर्ष पोलिस खात्‍याने काढला आहे.

वेर्णा येथे पाच महिन्‍यांत आठ अन्‍य अपघातांची नोंद झाली आहे. फोंड्यात 12 तर कुंकळ्‍ळीत चार अपघातांची नाेंद झाली आहे.

संपूर्ण दक्षिण गोव्‍यात 63 अपघातांची नाेंद झाली. यात कुणीही मृत्‍युमुखी पडले नाही. वास्‍को येथे पाच तर मडगाव, मायणा-कुडतरी व काणकोण या पोलिस स्‍थानकांच्‍या हद्दीत प्रत्‍येकी चारजणांचा रस्‍त्‍यावर बळी गेला.

मागच्‍या वर्षीच्‍या तुलनेत हे प्रमाण 1.85 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. दक्षिण गोवा पोलिस मुख्‍यालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: वय 50, एका स्टाईलवर लाखो मुली फिदा, तरीही अक्षय खन्ना एकटा; म्हणाला, 'बायकोची जबाबदारी घेण्यापेक्षा...'

SDMA Advisory: 25 बळींच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार सतर्क; नाईट क्लब्स, बार्स, रेस्टॉरंट्ससाठी 'गाइडलाइन्स' जारी

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Live News:भाजप नेत्यांच्या चुलत भावांचा गोव्यात अवैध नाईट क्लब व्यवसायात सहभाग! – विजय सरदेसाईंचा थेट आरोप

SCROLL FOR NEXT