Goa university student injured Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वळण जीवावर बेतले! वेर्ला-काणका मार्गावर भीषण अपघात; विद्यापीठातील विद्यार्थी गंभीर जखमी

Verla Canca Road Accident: दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

Akshata Chhatre

म्हापसा: वेर्ला-काणका येथे शुक्रवारी(दि. १६) सायंकाळी एक भीषण अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराच्या दिशेने उजवीकडे वळण घेत होती, त्याचवेळी वेर्ला-काणका येथून हणजूणच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने या चारचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार, डायलन फर्नांडिस (रा. हणजूण) हा तरुण गंभीर जखमी झाला आणि जागीच बेशुद्ध पडला.

घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने जखमी डायलनला एका खाजगी वाहनातून म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने आणि प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हापसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे वेर्ला-काणका मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT