Goa Accident: अपघात रोखणार कोण? गेल्या 4 महिन्यांत 87 जणांनी गमावला जीव, एप्रिलमध्ये 26 जणांचा मृत्यू

Goa Accident Case: राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ७९७ रस्‍ते अपघातांची नोंद झाली. त्यापैकी १९८ अपघात हे एप्रिल महिन्यांत झाले आहेत. या एकाच महिन्यात २६ जणांचा मृत्यू झाला.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ७९७ रस्‍ते अपघातांची नोंद झाली. त्यापैकी १९८ अपघात हे एप्रिल महिन्यांत झाले आहेत. या एकाच महिन्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्‍यात १७ चालक, ४ सहचालक व ५ पादचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे साधारण दिवसागणिक रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत ७९७ अपघात घडले तर त्याचा काळात २०२४ मध्ये ९८१ अपघातांची नोंद झाली होती. म्हणजे हे प्रमाण १८.७६ टक्के गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे.

रस्ते अपघातात एप्रिलपर्यंत २०२५ मध्ये ८७ जणांना तर २०२४ मध्ये ११३ जणांना जीव गमवावा लागला होता. यावर्षी १५ पादचाऱ्यांचा तर गेल्या वर्षी १४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रमाण ७.१४ टक्के वाढले आहे.

Goa Accident
Goa News: सरकारी आदेशाला केराची टोपली, पिसुर्लेत रस्त्याचे खोदकाम सुरुच; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

वाहतूक संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये १९८ रस्ते अपघात घडले. त्यात २४ प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. उत्तरेत व दक्षिणेत प्रत्येकी १२ अपघातांची नोंद आहे. ४३ किरकोळ अपघात नोंद असून त्यामध्ये उत्तरेत १३ व दक्षिणेत ३० अपघातांचा समावेश आहे.

Goa Accident
Goa Fraud: 11.28 कोटींच्या अफरातफर प्रकरणी 'अष्टगंध संस्थे'च्या 4 माजी संचालकांना अटक, काहींवर टांगती तलवार; 'EOC'चा बडगा

अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या २६ आहेत. असून त्यात उत्तरेत १२ तर दक्षिणेत १४ जणांचा समावेश आहे. १७ लोक गंभीर जखमी झाले. ७६ जणांना किरकोळ दुखापत झाली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १७ चालकांचा समावेश असून त्‍यात उत्तरेतील ९ तर दक्षिणेतील ८ जणांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com