Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात नित्रंयण सुटले, ट्रक कोसळला घरावर; शिरोड्यात भीषण अपघात

Shiroda Truck Accident: पहाटेच्या वेळी फोंडा तालुक्यातील शिरोडा येथे एक भीषण अपघात घडला

Akshata Chhatre

फोंडा: अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सतर्कता ही गरज बनली आहे. मंगळवारी (३०डिसेंबर) ला पहाटेच्या वेळी फोंडा तालुक्यातील शिरोडा येथे एक भीषण अपघात घडला. एका दुचाकीस्वराला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि त्याने थेट एका घराला धडक दिली. वाजे येथे ठिकाणी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.

हा अपघात जरी भयंकर असला तरीही सुदैवाने यात घरातील कुठल्याही मंडळींना किंवा ट्रक ड्राइव्हरला इजा झाली नाही, मात्र दुचाकीचालकाला मार बसल्याने उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

अचानक ट्रकने घराला धडक दिल्याने बरीच पडझड झाली आणि परिणामी घरमालक घरात अडकून पडला होता, मात्र त्याला मदत पुरवण्यात आल्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा प्रकार जरी आटोक्यात असला तरीही अशा अपघातांमुळे रस्ता सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT