Goa Accident Dainik Gomantak
गोवा

जुळ्या भावासोबत ती भेट ठरली अखेरची; आगोंद येथे रेंट कारने एकाला चिरडले, हरियाणाच्या पर्यटकाला अटक

हरियाणाच्या चालकास अटक : मृतावर शोकाकूल वातावरणात अंत्यविधी

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद, पान्ना येथे फरिदाबाद, हरियाणा येथील पर्यटक चालकाने (जी ए ०७,टी०२५३) ‘रेंट अ कार’ने चुकीच्या दिशेने येऊन समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात देसाईवाडा, आगोंद येथील संजू लक्ष्मण नाईक गावकर(५१), हे काल बुधवार, दि.१२ रोजी रात्री ८.४० च्या सुमारास गंभीर जखमी झाले.

काणकोण सामाजिक इस्पितळात उपचारावेळी त्यांचे निधन झाले, चालक अर्जुन सिंह(२५) याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलिस सहाय्यक निरीक्षक स्वदेश देसाई करत असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

उत्तरीय तपासणी नंतर गावकर यांचा मृतदेह आज (गुरूवार) ११.४५ च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी २ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी व अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अंत्यदर्शन घेतले. संजू नाईक गावकर घरापासून एक कि.मी. वर राहणाऱ्या आपल्या राजू नामक जुळ्या भावाकडे नेहमीप्रमाणे आला होता.

रात्री ८.३५ च्या सुमारास घरी देसाईवाडा येथे दुचाकी (जीए १०,बी५३९६) घेऊन येत असताना आगोंद किनाऱ्याला भेट देऊन परत काणकोणच्या दिशेने जाणाऱ्या बोलेनो ‘रेंट अ कार’ ने अन्य एका जीपला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली, तसेच ७ ते ८ मीटर फरफटत नेले, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार संजूला १०८ ने काणकोण इस्पितळात दाखल केले. उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल चालकाला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास चालवल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

संजू गावकर यांच्या पश्‍चात पत्नी लिना, लहान मुलगी, विवाहित भाऊ सत्यवान, राजू, भावजया तसेच विवाहित बहिण रुपा, भावना, साधना, भावोजी पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.

आगोंद पंचायत क्षेत्रातील अरुंद रस्त्यावरून पर्यटक भाड्याने घेतलेली वाहने बेफामपणे हाकून स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहेत. आतापर्यंत या पंचायत क्षेत्रात दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. या अपघातात बहुतेक पर्यटकच असलेले आढळून आले आहेत. काणकोण पोलिसांनी या अशा पर्यटकांना वठणीवर आणणे गरजेचे आहे.

किरण नाईक गांवकर, आगोंद स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT