Goa Accident Dainik Gomantak
गोवा

VIDEO: रेंटेड थार, सुसाट वेग अन् तरुणीची एक चूक; एकाचा जागीच अंत, 5 महिन्यांचा चिमुरडा सुदैवानं बचावला

Goa Accident News: निसर्गरम्य गोवा सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असतानाच, एका भीषण अपघाताने उत्तर गोव्यातील आसगाव परिसर हादरून गेला आहे.

Sameer Amunekar

पणजी: निसर्गरम्य गोवा सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असतानाच, एका भीषण अपघाताने उत्तर गोव्यातील आसगाव परिसर हादरून गेला आहे. सोमवारी दुपारी आसगाव येथील 'हॅपी बार' जंक्शनवर एका भरधाव रेंटेड 'थार' जीपने पर्यटकांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत भोपाळहून आलेल्या ६५ वर्षीय भगतराम शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने, या अपघातात एका पाच महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.

वेगवान थारचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ येथील शर्मा कुटुंब आपल्या खाजगी कारने गोव्याच्या सफारीवर असताना आसगाव जंक्शनवर हा अपघात घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या रेंटेड थार गाडीचा वेग प्रचंड होता. ही गाडी काही तरुणी चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक इतकी भीषण होती की शर्मा यांच्या गाडीचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

जागेवरच मृत्यू

या अपघातात ६५ वर्षीय भगतराम शर्मा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्व भीषण घटनेत एका पाच महिन्यांच्या बाळाला साधे खरचटलेही नाही. कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही बाळ सुखरूप राहिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

चालक बदलण्याचा प्रयत्न? लोकांचा संताप

अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. थारमधील तरुणींनी पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गाडी चालवणारी व्यक्ती बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT