Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: अपघातांचे सत्र सुरूच ! राज्यात दोन गंभीर अपघात; दोन्ही चालक जखमी

Goa Accident Case: राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून बरेचसे अपघात हे रहदारीचे नियम न पाळल्याने होत असल्याचे वारंवार समोर आलेय.

Ganeshprasad Gogate

Goa Accident Case: राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ आणि गवंडळी मार्गावर अपघात झाले असून या दोन्ही अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत.

काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने एका दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झालाय. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

स्पीड ब्रेकरजवळ स्ट्रीट लाईट नसल्यामुळे तसेच स्पीडब्रेकर न रंगवल्याने हा अपघात झाल्याचे समजतेय.

सदर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या दुचाकीस्वाराची ओळख पटली नसून या घटनेचा पंचानामा झालाय का हेही अद्याप समजले नाहीय.

तसेच दुसरा अपघात हा गवंडळी मार्गावर झाला असून या मार्गावर अवजड वाहनांनी प्रवेश करू नये यासाठी रस्त्यावर कमी उंचीवर उभारलेल्या रॉडला गुजरात पासिंगचा भरधाव वेगाने जाणारा कंटेनर धडकला.

या अपघातात चालक जखमी झाला असून कंटेनरचे देखील नुकसान झाले आहे. सदर कंटेनर कुंडईहून पणजीच्या दिशेने जात असताना हा अपघात झालाय.

या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही या वाहतूक सुरूच असल्याचे समोर आलंय. याही चालकाची ओळख समजू शकली नाहीय. तसेच पंचनामा झालाय का हेही समजू शकले नाहीय.

राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून बरेचसे अपघात हे रहदारीचे नियम न पाळल्याने होत असल्याचे वारंवार समोर आलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT