Goa Assembly: विरोधक एकवटले, विधानसभेत राम मंदिर प्रतिष्ठापना दिवसाच्या सुट्टीचा प्रस्ताव रद्द

Goa Assembly: विधानसभेच्या 5 व्या दिवशी राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी लागू करण्यासंदर्भातील विषय चांगलाच रंगला.
Ram mandir
Ram mandirDainik Gomantak

Goa Assembly: विधानसभेच्या 5 व्या दिवशी सभागृहात श्रीराम मंदिर निर्माण सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी लागू करण्यासंदर्भातील विषय चांगलाच रंगला.

22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक असून याचे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन तसेच, हा दिवस गोव्यात धार्मिक एकचार म्हणजेच धार्मिक सलोखा दिवस म्हणून घोषित करावा आणि या दिवशी सुट्टी जाहीर करावी, असा प्रस्ताव वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सभागृहासमोर मांडला.

धार्मिक सलोखा जपणारे आमचे गोवा आहे. ख्रिसमस, ईद ,दिवाळी सारखे उत्सव गोव्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे होतात. गोव्यातील धार्मिक आणि जातीय सलोखा कायम असल्याचे पंतप्रधांनाही कौतुक केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

यावर चर्चा करताना आमदार उल्हास तुयेकर, दिगंबर कामत, मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, नीलेश काब्राल यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले. तर या प्रस्तावाला विजय सरदेसाई, आल्टन डिकॉस्टा, आपचे आमदार वेन्झी व्हेगास यांनी विरोध केला.

तसेच वेळ्ळीचे आमदार क्रूज सिल्व्हा यांनी गोवा सरकार रामनवमीच्या सुट्टी देत असल्याने पुन्हा 22 जानेवारीच्या या सोहळ्याची सुट्टी देऊ नये असे सांगितले.

गोव्याने याआधीच राम नवमीची सुट्टी जाहीर केल्याने 22 जानेवारीच्या सुट्टीची गरज नसल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

त्यामुळे सभागृहात मांडण्यात आलेल्या 22 जानेवारीला राम प्राणप्रतिष्ठा दिनाच्या सुट्टीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com