Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

घोगळ येथे रिक्षाच्या धडकेने तिघे जखमी

याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात रिक्षाचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : घोगळ येथे भर वेगाने आलेल्या रिक्षाने पार्क केलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन दुचाकीवर बसलेल्या तिघाजणांना जखमी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात रिक्षाचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हा प्रकार घोगळ येथील दत्त मंदिराजवळ घडला. महंमद पाशा, जमशु पाशा हे एका दुचाकीवर बसले होते. यावेळी भर वेगाने आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यावेळी ते खाली पडल्याने जखमी झाले, तसेच अन्य एका दुचाकीला रिक्षाने धडक देऊन त्या दुचाकीवरील अन्य एका इसमाला जखमी केले.

दरम्यान, झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आलं आहे. आता कारमधील 4 मृतदेहही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहेत.

झुआरी पूल दुर्घटनेतील कार बाहेर काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरु होतं. 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. तसंच कारमधील चौघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अपघात एवढा भीषण होता की कारमधील कुणीही वाचण्याची शक्यता नव्हती. कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा कापून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळखही पटवण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

New Zuari Bridge: 'झुआरी'वरील मनोऱ्याचे काम 2031 पर्यंत पूर्ण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

Arpora Nightclub Fire: क्लबच्या तीन कर्मचाऱ्यांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब, अंतरिम जामिनावर मंगळवारी, तर मुख्य अर्जावर 28 रोजी सुनावणी

क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT