Goa Accident News: Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: मालवाहू रिक्षाला भरधाव कारची जोरदार धडक; चालकाचा मृत्यू

Goa Accident News: कारची धडक बसल्‍याने रिक्षाचालक ठार झाला, तर कारमध्ये बसलेले दोघेजण जखमी झाले. मृत चालकाचे नाव सुरेश चिप्‍पण असे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रस्‍त्‍यावरील पट्टे रंगविण्यासाठी साहित्य घेऊन आलेल्‍या एका मालवाहू रिक्षाला बुधवारी दुपारी सारझोरा (कुंकळ्‍ळी) येथे एका भरधाव वेगाने आलेल्‍या कारची धडक बसल्‍याने रिक्षाचालक ठार झाला, तर कारमध्ये बसलेले दोघेजण जखमी झाले. मृत चालकाचे नाव सुरेश चिप्‍पण असे आहे.

हा अपघात बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्‍याच्‍या सुमारास घडला. रस्‍त्‍यावरील पांढरे पट्टे रंगविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ही रिक्षा तेथे आली होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव गतीने येणाऱ्या इर्टिगा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली.

कार चक्काचूर

कारने रिक्षाला दिलेली धडक जबरदस्‍त होती की, कार उलटी पडून तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या कारमध्ये दोघेजण बसले हाेते. ते दोघेही जखमी झाले असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. जखमींची नावे सायंकाळपर्यंत मिळाली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT