Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी अंत; चालक युवतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

Kavya Powar

Goa Accident Death: राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पणजीतील सांतिनेज परिसरात झालेल्या अपघातात एका वयस्कर नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सांतिनेज परिसरातील काकुलो मॉलजवळ स्वामी मुथ्थू नावाचे ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत असताना मॉलच्या दिशेने येणाऱ्या युवतीच्या दुचाकीने त्याना धडक दिली. पिंकी सिंग (23) असे तिचे नाव आहे.

कांपाल येथील एमआरएफ दुकानासमोर हा अपघात घडला. यामध्ये स्वामी मुथ्थू हे जबर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती बेदरकारपणे दुचाकी चालवत असल्यामुळेच हा अपघात घडला आहे. दरम्यान, युवतीविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पालेकरांकडे फक्त मदतीसाठी गेले', पूजा नाईकचे राजकीय संबंधांवर स्पष्टीकरण

Crime News: क्रूरता! लग्नाला काही तास उरले असताना प्रियकर बनला 'मारेकरी', पैशांच्या वादातून प्रेयसीला संपवलं

Budget Smartphones: 5G, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी जबरदस्त... 'हे' स्मार्टफोन मिळतायत फक्त 15 हजारांत

Konkani Drama: स्तिमित करणारा आविष्कार; ‘मरणथाव’

नेपाळनंतर 'या' देशात Gen-Z करणार सत्तापालट? भ्रष्टाचार आणि ड्रग्सचा मुद्दा तापला, तरुणाई उतरली रस्त्यावर, तणाव शिगेला; VIDEO

SCROLL FOR NEXT