Goa Live Update 10 December: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी घ्या जाणून...

Goa Breaking News 10 December 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Update 10 December 2023
Goa Live Update 10 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

भाजपला पोर्तुगीज पासपोर्ट धारकांचा पुळका - आमदार विजय सरदेसाई

लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे भाजपला पोर्तुगीज पासपोर्ट धारकांचा पुळका आला की काय? विरोधी आमदार विजय सरदेसाईंचा प्रश्न. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर विजय बोलत होते.

खाण विरोधात मुळगाववासीय एकवटले

खाण विरोधात मुळगाववासीय एकवटले. खाण विरोधी सभेला प्रतिसाद. गाव उद्धस्त होत असेल, तर आम्हाला मायनिंग नकोच. ग्रामस्थांची मागणी.

'दिल चाहता है' नंतर 23 वर्षांनी फरहान अख्तर गोव्यातील शापोरा किल्ल्यावर...

बॉलीवूडमधील दुसरा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जात असलेल्या दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, निर्माता, गायक फरहान अख्तरच्या ताज्या गोव्या भेटीमुळे अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

फरहान अख्तर गोव्यातील शापोरा किल्ल्यावर आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा फरहान अख्तरने त्याच्या फिल्मी कारकिर्दीची सुरवात केली होती तेव्हा तो गोव्यात आला होता.

फरहान अख्तरने दिग्दर्शनातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता 'दिल चाहता है.' या चित्रपटाचे आणि गोव्याचे मोठे कनेक्शन आहे.

महिलेची फसवणूक; गुन्हा दाखल

सरकारी नोकरी देण्याचे भासवून तसेच वैद्यकीय चाचणीसाठी शुल्क म्हणून २० हजार रुपये घेत एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अमर मांद्रेकर ( पर्ये, सत्तरी) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला.

सावर्डे तिस्क येथे इतर राज्यातील फळ विक्रेत्यांची रस्त्यावर गर्दी; अपघात होण्याची शक्यता

सावर्डे तिस्क येथे इतर राज्यातील फळ विक्रेते पंचायतीच्या कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे रस्त्यावर फळे विकत आहेत. हा वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावरून मोठे कंटेनर जात असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

पणजीतील आजचे भाज्यांचे दर (प्रतिकिलो)

खुल्या बाजारातील दर

  • भेंडी - ८०

  • कोबी - ३०

  • गाजर -४०

  • फ्लॉवर -४०

  • मिरची - ६०

  • कांदा - ६०-७०

  • बटाटा - ४०

  • टोमॅटो - ५० -६०

फलोत्पादनाचे दर

  • भेंडी - ७०

  • कोबी - १७

  • गाजर - ३०

  • फ्लॉवर - २६

  • मिरची - ४०

  • कांदा - ५४

  • बटाटा - २९

  • टोमॅटो - ३८

पणजीतील सांतिनेज परिसरात झालेल्या अपघातात एका वयस्कर नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेकायदेशीररित्या वाळू उपसाप्रकरणी दोघांना अटक; पेडणे पोलिसांची कारवाई

 बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या कुडाळ येथील दोघांना पेडणे पोलिसांनी काल (शनिवारी) ताब्यात घेतले. यामध्ये चालक वासुदेव धुरी (23, इन्सुली) आणि अमित महाले (40, बांदा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रक जप्त केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com