Accident News Dainik Gomantak
गोवा

Accident News: बोरी येथे 'Hit And Run'; तर फोंड्यात साखर कारखान्याजवळ तीन ट्रकचा अपघात

अपघातांमध्ये चालक जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

Rajat Sawant

बायथाखोल - बोरी येथे रविवारी रात्री हिट अ‍ॅन्ड रनचा प्रकार समोर आला आहे. तर सोमवारी सकाळी संजीवनी साखर कारखान्यासमोर तीन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातांमध्ये चालक जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री बायथाखोल - बोरी येथे हिट अॅन्ड रनचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. रात्री एका अज्ञात कारने दुचाकीला धडक देऊन पळ काढला. या अपघातात जखमी विशाल गावडे व जयेश गावडे दोन्ही (रा. वेलिंग) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

तर दुसरा अपघात संजीवनी साखर कारखान्याजवळ ओव्हरटेक करताना तीन मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन ट्रक चालकांना किरकोळ दुखापत झाली. तर एका ट्रकच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT