Betul Bus Accident:  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बुडताना वाचली, पण अपघातात गेली; बेतूल येथील घटना

रोझारिनाचा बसच्‍या चाकाखाली चिरडून मृत्‍यू

दैनिक गोमन्तक

Betul Accident: दोन महिन्‍यांपूर्वी बेतूल येथे शेतात जाताना पाय घसरून ओहोळात पडल्‍याने तिचा मृत्‍यू तिच्‍या डोळ्‍यासमोर दिसत होता. त्‍यावेळी दैवाची साथ मिळाल्‍याने एका झाडाला पकडून तिने आपला प्राण वाचवला.

मात्र, त्‍याच महिलेला आज बेतूल येथे भाजी विकत घेताना बसने धडक दिल्‍यामुळे मृत्‍यूला सामोरे जावे लागले. बस पाठीमागे घेताना तिला या बसची धडक बसली आणि बसचे चाक तिच्‍या डोक्‍यावरून गेल्‍या तिचा तत्‍काळ मृत्‍यू झाला.

रोझारिना सिमॉईश (वय ६४) या महिलेची ही दुर्दैवी कथा आहे. ही महिला किटल-बेतूल येथे राहणारी असून सकाळी ८ वाजण्‍याच्‍या सुमारास ती भाजी विकत घेण्‍यासाठी बाजारात गेली होती.

यावेळी जीए - ०२ - यू - ४०४६ क्रमांकाच्‍या बसने तिला ठोकरले. बसचालक विलेश लोटलीकर (३७ असोळणा) याला निष्‍काळजीपणे वाहन चालवून मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍यामुळे अटक केली.

दैव बलवत्तर म्हणून तेव्हा वाचली होती

रोझारिना ही यापूर्वी ५ जुलै रोजी झालेल्‍या ‘त्‍या’ दुर्घटनेतून नशिबाने वाचली होती. रोझारिना आपली नणंद फ्‍लोरा डायस हिच्‍याबरोबर शेतात जात असताना शेवाळे आलेल्‍या एका पठारावर त्‍या दोघींचेही पाय घसरून त्‍या पाण्याने तुडुंब भरलेल्‍या ओहोळात पडल्‍या होत्‍या.

त्‍यापैकी फ्‍लोरा ही पाण्‍याच्‍या लोटात वाहून गेल्‍याने तिचा बुडून मृत्‍यू झाला. मात्र, रोझारिना हिच्‍या हाती त्‍यावेळी ओहोळातील झाड लागले. त्‍या झाडाला घट्ट पकडून थांबल्‍याने ती आपला जीव वाचवू शकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT