Morjim News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुत्र्याच्या वादातून महिलेच्या अंगावर गाडी घालणाऱ्या दीपन बत्राला न्यायालयीन कोठडी; मेरी यांच्यावर अंत्यसंस्कार

Morjim Accident News: आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केली असून त्याला पोलिस कोठडीच मिळायला हवी असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले

Akshata Chhatre

मोरजी: जुनसवाडा, मांद्रे येथील मारिया ऊर्फ मेरी फेलिक्‍स फर्नांडिस (वय. ७०) या महिलेला कारखाली चिरडून ठार मारण्‍याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी संशयित दीपन बत्रा याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयिताला न्यायालयीन कोठडी मिळू नये, यासाठी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केली असून त्याला पोलिस कोठडीच मिळायला हवी, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

दुसरीकडे, मेरी फर्नांडिस यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.२३) अंत्यसंस्कार करण्यात आले. कुत्र्यांच्या भांडणावरून दीपन राजू बत्रा यांनी मेरी फर्नांडिस यांच्यावर कार चढवून तिला चिरडून ठार केले होते. आम्ही पर्यटकांचे स्वागत करतो. परंतु पर्यटकांनी गोव्यातील नियम, कायदे समजून घ्यावेत. पर्यटकांनी स्थानिकांसोबत वाद घालू नयेत, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे जीत आरोलकर म्हणाले आहेत.

श्वानासह पोहचला स्थानकात

दीपन राजू बत्रा हा श्वानप्रेमी आहे. मात्र तो माणसांकडे माणसुकीच्या भावनेने कधीच पाहत नव्हता. घटनेनंतरही तो थेट मांद्रे पोलिस स्टेशनवर गेला आणि मांद्रे पोलिसांनी श्वानाला आणि दीपन राजू बत्रा याला वातानुकूलित खोली घेतले होते, असा दावा काही नागरिकांनी केला आहे.

एकूण प्रकार काय?

जुनासवाडा-मांद्रे येथे घडलेल्या एका प्रकरणात मारिया फेलिझ फर्नांडिस नामक एका स्थानिक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पाळीव कुत्र्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दिल्लीमधील रहिवासी आणि स्थानिक महिला यांच्यात संघर्ष झाला, त्यानंतर एक गाडी येऊन महिलेला धडकली ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मारिया फेलिझ फर्नांडिस हिच्या घराजवळ एक दिल्लीतील कुटुंब कुत्र्याला फिरवायला घेऊन यायचं. दिल्लीमधील राशिवाशांचा कुत्रा आणि मारिया फेलिझ यांच्या दोन कुत्र्यांमध्ये भांडण व्हायचं आणि रोजची कटकट नको म्हणून मारिया फेलिझ आणि त्यांच्या मुलाने दिल्ल्लीतील कुटुंबाला त्यांच्या कुत्र्याला आवर घालायला सांगितलं होतं, याप्रकरणातून त्यांच्यात भांडण जुंपलं. यानंतर एक गाडी भरधाव वेगाने वेगाने मारियाफेलिझ हिच्या दिशने आली आणि तिला धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: वाढत्या घरफोड्या! कोलवा पोलिस तपासासाठी उत्तरप्रदेशात; लवकरच संशयित जाळ्यात सापडण्याची शक्‍यता

Goa Accident: कारचे तुकडे - तुकडे झाले, डिव्हायडर फोडून टँकरची रेंट अ कारला धडक; गोव्यात दोन पर्यटकांचा मृत्यू

Bicholim Car Drowning: रिव्हर्स घेताना गोंधळ झाला, कार गेली थेट नदीत; डिचोली सारमानस धक्क्यावरील थरारक घटना Video

Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात धक्कादायक उमेदवारी

SCROLL FOR NEXT