
म्हापसा: मुंबईतील रहिवासी आणि मुंबई नगरपरिषदेसाठी डायव्हर म्हणून काम करणाऱ्या अँथनी मारियन कार्डोझ नावाच्या इसमाला याला म्हापसा येथे दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) दारूच्या नशेत त्याने अनेक गाड्यांना धडक दिली आणि यानंतर थांबण्यास नकार दिला होता, इतकेच नाही तर टायर फुटल्यावरही तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतच होता.
मुंबईहून गोव्यात आलेला कार्डोझ म्हापसा येथील व्हिलियाना हॉटेलमध्ये थांबला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, तो मित्रांसोबत जुन्या गोव्याच्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गोव्यात आला होता. मात्र, रविवारी रात्री त्याने मद्यधुंद अवस्थेत केलेल्या कृत्यामुळे त्याच्या गोव्यातील सहलीला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
दारूच्या नशेत बेपर्वाईने गाडी चालवत त्याने म्हापसा येथे अनेक गाड्यांचे नुकसान केले आहे. इतर वाहनचालकांसाठी धोका निर्माण करत त्याने गाड्यांचे नुकसान केले, तरीही कार्डोझने गाडी थांबवण्यास नकार दिला. त्याचे टायर फुटल्यावरही तो गाडी चालवत राहिला आणि अखेर म्हापसा पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांनी त्याची ब्रेथलायझर चाचणी केली असता, त्याच्या शरीरातील १८६ टक्के दारूचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. कायद्यानुसार हे प्रमाण मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे आणि म्हणूनच कार्डोझला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याची MH 03 EL 5159 अशी नंबरप्लेट असलेली ब्रेझा गाडी जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून, गोव्यातील दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आणि रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या गोवा पोलिसांनी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.