Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: ओव्हरटेकने घेतला जीव! पर्वरीत कारचा तर शिरोड्यात कदंबाचा अपघात

राज्यात अपघातांची मालिका सुरूच

Kavya Powar

Goa Accident Death: गोव्यात अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आज (रविवार) राज्यात दोन भीषण अपघातांची नोंद झाली आहे.

पर्वरीतील गौरी पेट्रोल पंपाजवळ पहाटे 3.15 वाजता अपघात ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

ओव्हरटेकने घेतला जीव

पर्वरीतील गौरी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. कार एका कंटेनरला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला आहे.

यामध्ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे 3.15 च्या सुमारास घडली. संतोष दोडामणी (30, रामनगर बेती, बार्देश) असे मृत चालकाचे नाव आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कदंबाची झाडाला धडक

दुसरीकडे, आज सकाळी कदंबा बसचाही अपघात झाला आहे. शिरोडा साखरवाळ येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस झाडाला जाऊन धडकली. यामध्ये 11 प्रवाशी जखमी झाले आहेत.

अधिक उपचारांसाठी सहा प्रवाशांना मडगाव हॉस्पिटलमध्ये, एकाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तर चार जणांना शिरोडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT