Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: पर्वरी आणि वेर्णा येथे अपघात; अपघातांची मालिका सुरुच

Goa Accident Case: बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्याने होत असल्याचे दिसून आले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Accident Case: रविवारी दुपारपर्यंतच्या सत्रात राज्यात दोन अपघातांची नोंद झाली असून सकाळी पर्वरी राष्ट्रीय महामार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला.

या अपघातात चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारचा समोरून येणाऱ्या कारला धडक बसली असून या अपघातात एक कार पलटली आहे. या अपघातात कुणी जखमी झाले असल्याची माहिती समजू शकली नाही.

तसेच रविवारी दुपारच्या सत्रात वेर्णा (IDC) ओद्योगिक वसाहत रासय येथे कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटला असून याही अपघातात कुणी जखमी झाले असल्याची माहिती समजू शकले नाही.

तसेच हा अपघात कास घडला हेही समजू शकले नाही. या दोन्ही अपघातांच्या पंचनामाबाबतही कोणतीही माहिती समजू शकले नाहीय.

सध्या राज्यात अपघातांचे सत्र वाढत असून बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्याने होत असल्याचे दिसून आले आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ आणि गवंडळी मार्गावर अपघात झाले असून या दोन्ही अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT