Goa Accident Cases
Goa Accident Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Cases: गोव्यातील अपघातांचे प्रमाण कमी होईना!

दैनिक गोमन्तक

Goa Accident Cases: राज्यात वाहतूक विभाग तसेच वाहतूक पोलिसांकडून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत चालकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे.

वाहतूक विभागाने यावर्षी गेल्या 8 महिन्यांत 2302 वाहन परवाने निलंबित केले आहेत. दरमहा 288 वाहनचालकांचे परवाने निलंबित केले जात आहेत. त्यामध्ये अर्धेअधिक निलंबित परवाने ही ओव्हर स्पीडिंग व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांचे आहेत. मडगावमध्ये सर्वाधिक प्रकरणे (720) नोंद झाली असून हे प्रमाण 31 टक्के एवढे आहे.

वाहतूक (Traffic) खात्यातर्फे दहा तालुक्यांच्या साहाय्यक संचालक कार्यालयामार्फत गेल्या आठ महिन्यांत असलेल्या मनुष्यबळाच्या आधारे वाहनचालकांविरोधात अधूनमधून मोहीम राबवून दंड देण्यात आला आहे. ओव्हर स्‍पीडिंगची प्रकरणे पणजी, मडगाव, फोंडा व पेडणे या तालुक्यांत नोंद झालेली आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग सुसाट असल्याने ‘रडार गन’द्वारे त्यांची नोंद करून कारवाई करण्यात आली.

पणजीतील विभागाने ओव्हर स्पीडिंग प्रकरणी 238, पेडणे 165, मडगाव 239 तर फोंड्यात 253 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. तर, विविध वाहन नियम उल्लंघनप्रकरणी सुमारे 10 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे. त्यातील काही जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर काहींबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

वाहन चालविताना मोबाईलचा वापर केला जात असल्याने वाहतूक अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई (Action) सुरू केली आहे. गेल्या 8 महिन्यांत 550 चालाकांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. सर्वाधिक प्रकरणे मडगावात (227) तर त्यापाठोपाठ म्हापसा (76), केपे (71), फोंडा (61), वास्को (48) व पणजी (37) यांचा समावेश आहे.

राज्यातील काही महामार्गावरील जंक्शनच्या ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आलेले आहेत. तेथे सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनचालकांची प्रकरणे 407 इतकी नोंद झाली आहेत. त्यामुळे कठोर पावले वाहतूक विभागाने उचलली आहेत.

वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याच्या कारवाईत सर्वाधिक प्रकरणे मडगावात (124) नोंद झालेली आहेत. त्यापाठोपाठ म्हापसा (68), वास्को (68) व पणजी (54) यांचा क्रमांक लागतो. राज्यात नवा कायदा लागू करण्यात आला आहे.

भालचंद्र सावंत, उपसंचालक, वाहतूक विभाग-

मोटारवाहन कायद्यातील दुरुस्तीमुळे दंडाच्‍या रकमेत (चलन) बऱ्याच पटीने वाढ झाली आहे. तरीसुद्धा वाहनचालक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. हा परवाना किमान 3 महिने तर जास्तीत जास्त 6 महिने निलंबित करण्याची कायद्यात तरतूद आहे.

एखाद्या भीषण अपघाताला (Accident) चालक पूर्णपणे जबाबदार असल्यास व पोलिसांनी वाहनचालक परवाना रद्द करण्याची शिफारस केल्यास तो कायमचा रद्द करण्यात येतो. त्याला पुन्हा वाहनचालक परवाना मिळू शकत नाही.

चालू वर्षातील कारवाई: वाहतूक विभाग आणि संख्या पणजी 348, म्हापसा 268, पेडणे 239, मडगाव 720, फोंडा 372, वास्को 202, केपे 126, काणकोण 24

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT