Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच!

Goa Accident : डिचोली-साखळी रस्त्यावर मालवाहू पिकअप उलटली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident :

डिचोली-साखळी रस्त्यावर मालवाहू रिक्षा उलटल्याने चालकासह पाचजण जखमी झाले. पैकी दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज (रविवारी) सायंकाळी कुळण-सर्वण येथे आधार हॉस्पिटल परिसरात मुख्य रस्त्यावर घडला.

या अपघातात जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याला उपचारार्थ बांबोळीच्या ''गोमेकॉ''त दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेले पाचहीजण राज्याबाहेरील असल्याचे समजते.

चालक रोहित राठोड (वय-१८), मुस्तुकीम (४० वर्षे), रसीम (४० वर्षे) आणि रंजित दास (२५ वर्षे) अशी जखमीची नावे आहेत. या अपघातात वाहनाची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे.

जीए-०८-व्ही-४५९१ या क्रमांकाची मालवाहू मिनी पिकअप साखळीच्या दिशेने जात होती. कुळण येथे अचानक हे वाहन एका बाजूने रस्त्यावर उलटले.

त्याबरोबर वाहनातील तिघेजण वाहनातच अडकून पडले. हा अपघात नेमका कसा झाला ते समजू शकले नाही. मात्र अतिवेगामुळे ब्रेक लावताच वाहन रस्त्यावरच उलटले असावे, असा अंदाज आहे. या वाहनात एकूण पाचजण होते.

त्यापैकी मागे बसलेले तिघेजण रस्त्यावर आपटून जखमी झाले. त्वरित जखमींना डिचोलीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पैकी एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ पुढे हलविण्यात आले आहे. डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून ते पुढील तपास करीत आहेत.

मदतकार्य

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त अडकलेल्यांना बाहेर काढले. त्यासाठी क्रेनचीही मदत घेण्यात आली.

अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर राजन परब यांच्या मार्गदर्शनाखाली गौरेश मांद्रेकर (चालक), महेश नाईक, सागर कुंकळेकर, भारत म्हाळशेकर, अमोल चोर्लेकर आणि गौरेश गावस यांनी मदतकार्यात भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खास 'आदमी पक्ष'!- संपादकीय

Marriage Registration: पोर्तुगीज कायद्याचा अडथळा दूर! रशियन महिला आणि कोलव्याच्या तरुणाच्या लग्नाला हायकोर्टाचं ग्रीन सिग्नल; काय नेमकं प्रकरण?

Goa Politics: पणजी पोलिसांचा दणका! विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार क्रुझ सिल्वा यांची 'त्या' आंदोलनप्रकरणी चौकशी

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची फोंड्यातही ‘क्रेझ’?

Goa Cyber Crime: सावधान गोमंतकीयांनो! तीन महिन्यांत 1030 जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात; मार्चपर्यंत तब्बल 25 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT