Camurlim Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीची धडक; कार्मुली अपघातात 26 वर्षीय युवक जागीच ठार

Camurlim Road Accident: अपघातानंतर चारचाकी चालकाने त्वरित पळ काढला

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यात सध्या अपघातांचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय. शनिवार (दि.२८ डिसेंबर) रोजी रात्रीच्या वेळी कामुर्ली रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले आणि ॲरॉन फर्नांडिस (२६) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालकाने त्वरित पळ काढला मात्र स्थानिकांच्या मदतीने जखमी युवकाला वेळेत उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जबर धडक दिली, यामुळे ऋग्वेद बांदोडकर यांच्या डोक्याला मार बसला, डावा पाय फ्रॅक्चर झाला आणि इतर शरीराला देखील दुखापत झाली. या भीषण अपघातात ॲरॉन फर्नांडिस मात्र कंपाउंडच्या भिंतीवर आदळला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्याला प्राण गमवावे लागले.

स्थानिकांच्या मदतीने ऋग्वेदला प्राथमिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मृत ॲरॉन फर्नांडिस हा शिवोली येथील रहिवासी होता आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. या अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस हवालदार शिवाजी शेटकर यांनी केला तर पुढील तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक आदित्य गाड करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT