Ganeshpuri Mapusa Accident: दुचाकीवर बसलेले असताना म्हापश्याच्या दिशेने जाणारी  एक चारचाकी भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्याना धडक दिली.
Ganeshpuri Mapusa NewsDainik Gomantak

Mapusa Accident: दुचाकीवर बसताच भरधाव कारने उडवले, मुलगा-वडिलांचा भीषण अपघात; चालकानंं केलं होतं मद्यपान?

Ganeshpuri Mapusa Accident: दुचाकीवर बसलेले असताना म्हापश्याच्या दिशेने जाणारी एक चारचाकी भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्याना धडक दिली
Published on

म्हापसा: गणेशपुरी म्हापसा येथील हाऊजिंग बोर्डमध्ये दुपारी २-२:३० च्या सुमारास एक अपघात घडला. रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या मोटारसायकलवर असलेल्या मुलाला आणि वडिलांना कर्नाटकमधील एका इनोव्हाने जबरदस्त धडक दिल्याने वडील आणि मुलगा जबर जखमी झाले . गाडीला धडक दिल्यानंतर चारचाकी चालक तडक तिथून निघून गेला आणि घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

अपघातात जखमी झालेल्या वडिलांचे नाव रफिक असे असून त्यांना उपचारांसाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला या अपघातात बरीच जखम झाली आहे. रफिक यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ते मुलासह एक दुकानासमोर दुचाकीवर बसलेले असताना म्हापश्याच्या दिशेने जाणारी एक चारचाकी भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्याना धडक दिली.

Ganeshpuri Mapusa Accident: दुचाकीवर बसलेले असताना म्हापश्याच्या दिशेने जाणारी  एक चारचाकी भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्याना धडक दिली.
Goa Accident: रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, ख्रिसमसला कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

या अपघातात त्यांच्या मुलाला बरीच जखम झाली असून त्याच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. प्रत्यक्षदर्शी काही लोकांनी या अपघाताबद्दल माहिती दिली, त्यांच्या मते कर्नाटकमधल्या या गाडीचा चालक कदाचित मद्यपानाच्या धुंदीत असण्याची शक्यता आहे. सध्या इनोव्हाचा चालक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com