Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बिट्स पिलानी कॅम्पसच्या गेटसमोर थरार; ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, कोल्हापूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Hit-And-Run Case Near BITS Pilani Goa campus: गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७-बी वर रविवारी सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Sameer Amunekar

गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७-बी वर रविवारी सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. झुआरीनगर येथील प्रसिद्ध 'बिट्स पिलानी' (BITS Pilani) गोवा कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शिरोलकर (३२, रा. बैणा, मूळ गाव कोल्हापूर) हा रविवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या दिशेने जात होते. प्रवीण हा वेर्णा येथील नामांकित 'सिप्ला' कंपनीत कार्यरत होते. महामार्गावरून जात असताना त्यांच्यासोबतच एक ट्रक आणि एक टँकर देखील त्याच दिशेने जात होते.

दोन अवजड वाहनं जात असतानाही प्रवीण यानं रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना प्रवीण यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुर्दैवाने, तो थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आला. ट्रकचे चाक त्याच्यावरून गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला.

हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने मदतीसाठी थांबण्याऐवजी तिथून पळ काढला.

चालक पोलीस ठाण्यात

वेर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, पसार झालेल्या ट्रकचालकाने काही वेळाने वेर्णा पोलीस ठाण्यात स्वतःहून आत्मसमर्पण केले.

पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त केला असून चालकाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा अपघात नक्की कशामुळे झाला आणि यात कोणाची चूक होती, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT