Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University Director Threatened: ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याची गोवा विद्यापीठात दबंगगिरी; विद्यार्थी कल्याण संचालकांना धमकी

अन्य पॅनलच्या अनेक उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Goa ABVP Member Threatened Director Of Student Welfare: गोवा विद्यापीठातील निवडणूक रद्द प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. अभाविप संघटनेच्या एका कार्यकर्त्याने विद्यार्थी कल्याण संचालकांना कार्यालयातून बाहेर पडल्यास दंडुक्याने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे येथील वातावरण तापले आहे.

जर हा विद्यार्थी प्राध्यापकांना धमकावू शकतो तर विद्यार्थ्यांनादेखील काहीही करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

आम्हाला विद्यापीठात राजकारण आणायचे नाही, त्यामुळे कुलगुरूंनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी संघटनेचे उमेदवार ऋषांक नाईक यांनी केली.

ते गोवा विद्यापीठ आवारात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष साहिल गाड, अपूर्वा नाईक तसेच इतर विद्यार्थी उपस्थित होते.

उमेदवारांना धमक्या

जो विद्यार्थी दांडा घेऊन मारायला गेला होता, त्या विद्यार्थ्याने आमच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अमुक ठिकाणाहून विद्यापीठात येता.

तुमच्याबद्दल आम्हाला माहिती आहे. तुम्ही जर आमच्या बाजूने आला नाहीत तर निवडणुकाच होऊ देणार नसल्याचे देखील त्या विद्यार्थ्याने सांगितले होते, असे अपूर्वा नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT