दाबोळी: पंचायत क्षेत्रांतील कचरा समस्या (Garbage Problem) दुर करण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प, साम्रगी पुनर्प्राप्ती सुविधा शेड, कचऱ्यापासून बायो मिथेन प्रकल्प उभारण्यासाठी (Goa) राज्यातील सुमारे 40 पंचायतींना योग्य ती मदत देणार, अशी माहिती पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो (Transport Minister Mavin Gudinho) यांनी चिखली येथे एका कार्यक्रमात दिली.
चिखली पंचायतीचा विनावापर कॉम्पॅक्टर मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले यांच्याकडे सोपविण्यात आला.सदर कॉम्पॅक्टरचा वापर मुरगाव पालिका करणार आहे.
चिखलीत साम्रगी पुनर्प्राप्ती सुविधाचे उद्घाटन तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प व बायो मिथेन प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. याप्रसंगी चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, उपसरपंच कमलाप्रसाद यादव, पंचसदस्य मेरी मास्कारेन्हस, नगराध्यक्ष दामोदर कासकर,उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले, नगरसेवक
सुदेश भोसले, विनोद किनळेकर, गटविकास अधिकारी प्रसिध्द नाईक, बोगमाळोचे उपसरपंच संकल्प महाले आदी उपस्थित होते. गुदिन्हो म्हणाले की, कचरा प्रक्रिया प्रकल्प, बायो मिथेन प्रकल्प उभारणी हाती घेणारी चिखली पंचायत पहिली पंचायत ठरणार आहे.
चिखली पंचायतीच्या या सर्व सुविधांसाठी सुमारे दोन कोटी ऐंशी लाख रूपये खर्च होणार आहे. चिखली कोमुनिदादने प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे चार हजार चौरस मीटर जागा दिल्याबद्दल चिखली कोमुनिदादचे अटर्नी रेमोंड
कालो यांचे गुदिन्हो यांनी कौतुक केले. पाच टन कचरा हाताळण्याची क्षमता येत्या सहा महिन्यांमध्ये सदर प्रकल्पांची कामे होतील. कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये
पाच टन कचरा हाताळण्याची क्षमता असेल. चिखली पंचायत क्षेत्रामध्ये तीन टन कचरा रोज जमा होतो. या सर्व सुविधामुळे चिखली पंचायत क्षेत्रातील कचरा दूर
होण्यास मदत होईल. लोकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे. चिखली पंचायत क्षेत्रातील कचऱ्याचे ढीग हटविण्यात येईल, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.