Goa News | Abhay Bang Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यातही गुजरातप्रमाणे दारुबंदी करा; अभय बंग यांचा सरकारला सल्ला

Goa News: पर्यटन स्थळाच्या नावाखाली मद्यपानाला मुक्त हस्त देवून जीवांशी खेळू नका.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा सरकारने गुजरातप्रमाणेच दारु बंदी जाहीर करायला हवी, पूर्ण बंदी शक्य नसेल तर किमान निर्बंध तरी लादावेत. बार व मद्यविक्री दुकानांची संख्या कमी करावी, रात्री 10 नंतर सर्व बार बंद असावेत, वाहन चालकांची सक्तीने चाचणी घेण्यात यावी.

पर्यटन स्थळाच्या नावाखाली मद्यपानाला मुक्त हस्त देवून जीवांशी खेळू नये, असा सल्ला मॅगसेसे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी दिला आहे. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक डॉक्टर संघटनेची 38 वी वार्षीक परिषद दोनापावला येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झाली.

गडचिरोली सारख्या आदिवासी भागात निस्वार्थ सेवा बजावणारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉक्टर अभय बंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दारू सोडण्यावर भर देताना अपघाताचे मूळ कारण दारुचे व्यसन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही गावात दारु विक्री बंद करण्यात आली हा मोठा निर्णय होता, असे ते म्हणाले.

महिन्याला 20 लोकांचा मृत्यू-

दारू पिल्यामुळे यकृत निकामी होते. राज्यात दर महिन्याला किमान 20 जणांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू होतो. दारुमुळे अपघातही वाढत आहेत. किमान 10 युवक ठार होत आहेत. दारुमुळे आपण कितीतरी लोक गमावत आहोत, असे गोमेकॉचे डीन बादेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ना अटल, ना चंद्रपूर तिसऱ्या जिल्ह्याचे नाव 'कुशावती', CM प्रमोद सावंतांनी सांगितले महत्व आणि इतिहास; ZP चे गणितही केले स्पष्ट

कारवाईचा बडगा! गोव्यात 10 नाईट क्लब सील, पण शिल्पा शेट्टीच्या 'बास्टियन'ला 'VIP' वागणूक?

वरगाव-पिळगावच्या ऐतिहासिक चामुंडेश्वरीची 2 जानेवारी पासून जत्रा! रंगणार ‘नौकाविहार’; 5 दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Goa Live News: हडफडे आग प्रकरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Ponda Accident: भीषण अपघातानंतर मशिनरी पेटवली, कामगारांना मारहाण! दोघांना अटक; 16 जणांविरोधात गुन्‍हा दाखल

SCROLL FOR NEXT