Vijai Sardesai: सरकारला गोवेकरांपेक्षा ओला, उबरची जास्त काळजी

गोव्यातील ऑनलाईन कॅबवरुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच
President of Goa Forward Vijay Sardesai
President of Goa Forward Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक सरकारने काल दिनांक 7 अ‍ॅपद्वारे सेवा देणाऱ्या ऑनलाईन कॅब (Taxi) कंपन्यांना राज्यातील सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात ओला, उबर या कार सेवांसह रॅपिडो या ऑटो सेवेलाही अवैध घोषित केले गेले आहे. आदेशाचे पालन न केल्यास कंपनी आणि वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. याचा दाखला देत आज गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई सरकारला धारेवर धरले.

(Vijay Sardesai alleges Minister Mauvin Godinho on Ola, Uber issue)

President of Goa Forward Vijay Sardesai
Padi Waterfall: बंगळुरू येथील पर्यटक पाडी धबधब्यात बुडाला

यावेळी आमदार विजय सरदेसाई म्हणाले ओला आणि उबर साठी गोवा सरकारने कर्नाटक राज्याचा आदर्श घ्यावा. टॅक्सीच्या प्रश्नांसाठी ज्याप्रमाणे गोवा सरकार मार्ग काढून बाहेरील कंपन्यांना येऊ देण्याऐवजी राज्यातील टॅक्सी चालकांना चालना देत असेल तर गोवा सरकारला याचा विचार करायला काय हरकत आहे? याबाबत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी अभ्यास करण्याची गरज असून यावर त्यांनी विचार करावा असेही ते म्हणाले.

President of Goa Forward Vijay Sardesai
Velsao: वेळसाव येथे विना परवानगी रेल्वे ट्रॅक सर्वेक्षणाचा प्रयत्न; नागरिक आक्रमक

कर्नाटकात जे चालते ते गोव्यात चालणार नाही याला कशाचा आधार आपण घेतला आहे? असा प्रश्न त्यांनी गोवा सरकारला विचारला. याबाबत बोलताना म्हणाले की, मंत्री माविन गुदिन्हो यांनी थोडा पेपर वाचावा आणि या प्रश्नाबाबत कर्नाटक राज्याचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

आज कर्नाटकात ही भाजपचे सरकार आहे. तसेच कर्नाटकचे काही मंत्री निवडणुकीसाठी गोव्यात येतात त्यांनी ओला उबरला दुर ठेवले आहे. तर गोवा राज्यातील मंत्र्यांना ओला उबरची गडबड कशासाठी असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. यातून त्यांना गोवेकरांपेक्षा ओला, उबरची काळजी जास्त असल्याचा आरोप केला.

यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा मोपा विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये गोव्यातील किती नागरिक आहेत? याकडेही राज्यातील नेत्यांनी पहावे. यावरून राज्यातील नेत्यांना कोणत्याही स्थितीत गोवेकरांचा विचार करावयाचा नसुन त्यांना फक्त आपल्याला हवे ते करायचे आहे असा आरोपी त्यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com