पणजी: आम आदमी पक्षाने (AAP) आज गोवेकरांना विशेषत: तरुणांना नोकऱ्या (Jobs) उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या (Goa Government) अपयशाविरोधात ठाम भूमिका घेण्यास सांगत एक आंदोलन सुरू केले.
गोव्यातील तरुणांची सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगाराची अनुपलब्धी हे आहे. मग ती सरकारी असो किंवा खासगी, गोवा सरकार सर्व गोवेकरांना नोकऱ्या देऊ शकले नाही किंवा खासगी नोकऱ्याही निर्माण करू शकले नाही. डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठ्या घोषणा केल्या, पण जर त्यांनी आपले वचन पाळले असते तर आज बेरोजगारीची समस्या भासली नसती, असे ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यावेळी म्हणाले.
आम्ही गोव्यातील लोकांना काय हवे आहे, ते विचारून एक चळवळ सुरू करत आहोत. सध्याची व्यवस्था हवी आहे का त्यांना बदल हवा आहे ? त्यांना फक्त मंत्र्यांच्या नातेवाईकांसाठी नोकऱ्या हव्या आहेत, की सर्व गोवेकरांना नोकरी मिळावी असे वाटते? गोव्यात नोकऱ्या निर्माण करणे आणि सरकारी नोकऱ्या देणे दोन्ही शक्य आहे. सर्व मेहनती गोवेकरांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आम्हाला एकत्र यावे लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.