आम आदमी पार्टीचे पुंडलिक धारगळकर आणि वकील प्रसाद शहापूरकर व इतर पदाधिकारी (Goa AAP) Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: आम आदमी पार्टीने 'रास्ता रोको'चा इशारा देताच खड्डे बुजवण्याचे काम सुरु

खड्डे व्यवस्थित बुजवले नाहीत तर चतुर्थीनंतर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा (Goa AAP)

Dainik Gomantak

Goa AAP: राष्ट्रीय महामार्ग (National Highway 17) पत्रादेवी ते धारगळ (Patradevi To Dhargalim) या रस्त्याला पडलेले खड्डे आणि एव्हीआर कंपनीने (AVR Company) पडलेल्या खड्ड्यात माती घालून बुजवण्याचे काम काल पासून सुरु होते, परंतु खड्ड्यात माती घालून बुजवण्याचा प्रकार घडल्याने ते खड्डे पुन्हा पावसामुळे मोठे झाले, 8 रोजी आम आदमी पार्टीचे पुंडलिक धारगळकर (AAP Leader Pundalik Dhargalkar) आणि वकील प्रसाद शहापूरकर (Adv. Prasad Shahapurkar) यांच्या नैतृत्वाखाली रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता आणि दुपारी रस्ता रोको मालपे (Malpem) येथे करण्यात येणार होते, आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलीस सज्ज्य होते, दरम्यानच्या काळात अभियंत्यानी आम आदमी पार्टीच्या नेत्यांकडे चर्चा करून दुपारी अडीच नंतर खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अडीच वाजता यंत्राणा आली आणि खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम आदमी पार्टीने आदोलन स्थगित ठेवले. आणि जर व्यवस्थित खड्डे बुजवले नाही तर पुन्हा चतुर्थी नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा (Protest After Chaturthi) इशारा दिला.

यावेळी खास थिवी मतदार संघातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्ये उमेश कवठणकर, गोड्वेन डेलीमा, सौ. धारगळकर आदी प्रमुख कार्यकर्त्ये उपस्थित होते.

यावेळी आम आदमी पक्षाचे मांद्रेचे नेते प्रसाद शहापूरकर यांनी बोलताना या रस्त्यासाठी संयुक्तपणे आंदोलन सुरु केले होते, आणि संबधित खात्याला निवेदन दिले होते. राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे रस्त्याची दननीय अवस्था झाली आहे. वर्षभरात विविध माध्यमातून नागरिक आवाज उठवत आहेत, न्यायालयात प्रकरण पोचले. आता त्या पलीकडे जावून आम आदमी पार्टीने आंदोलन छेडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार ८ रोजी आंदोलन करण्याची तयारी केली. सर्व्हिस रस्ते आहे त्यातून चालायलाही मिळत नाही. जे खड्डे पडलेले आहेत त्यात अनेकांना अपघात झाले आहेत, हा एकमेव राष्ट्रीय रस्ता आहे. चतुर्थीच्या काळात तरी या रस्त्यावरून सुरळीतपणे वाहनचालकाना जायला मिळावे अशी अपेक्षा ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आवाज आमचा कंपनी पर्यंत पोचला आणि त्वारीत अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना पाठवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आंदोलन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे शहापूरकर यांनी सांगितले.

पुंडलिक धारगळकर यांनी बोलताना म्हणाले की, सरकार अस्तित्वात आहे कि नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाला पडलेले खड्डे म्हणजे जनतेला त्रासात टाकणारे हे सरकार आहे. आम आदमी पार्टीने आंदोलनाचा इशारा देताच खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त करत असताना पूर्ण खड्डे व्यवस्थित बुजवले नाही तर परत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT