Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

गोव्याला जागतिक पर्यटन केंद्र बनवू; केंद्रीय पर्यटन मंत्री

जगभरातील सर्वोत्कृष्ट पर्यटन केंद्रांपैकी एक असा गोव्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार बांधील आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: जगभरातील (World) सर्वोत्कृष्ट पर्यटन केंद्रांपैकी एक असा गोव्याचा (Goa) समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार बांधील आहे त्यासाठी सर्वतोपरिने प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतीक मंत्री (Minister) जी. एस रेड्डी यांनी सिकेरीत सांगितले.

गोव्याच्या मुक्ती संग्रामाचा साक्षी असलेल्या येथील जुन्या तुरुंगाचे पर्यटन केंद्रात रुपांतर करून राज्याच्या साठाव्या स्वातंत्र्याच्या पाश्वभुमीवर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून स्थानिक जनतेला मिळालेला दुवा असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी पुढे सांगितले. कांदोळी पंचायत क्षेत्रातील सिकेरी येथील पठारावर जुन्या आग्वाद तुरुंंगाचे सुशोभित पर्यटन केंद्रात नविनीकरण करण्यात आले आहे. त्या वास्तुचे लोकार्पण केल्यानंतर केंद्रीय मंत्री रेड्डी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोवा राज्य पर्यटनद्रुष्ट्या सक्षम आहे, परंतु केवळ एकट्या पर्यटनावरच येथील अर्थव्यवस्थेचा भार टाळण्यासाठी केंद्राकडून राज्याला अधिकाधिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे मंत्री रेड्डी यांनी पुढे सांगितले. एकेकाळी लसीकरणासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असलेला भारत देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशांतर्गत लसीची निर्मीती करून इतरांच्याही पुढे गेलेला असून ही गोष्ट देशवासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे रेड्डी यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात राज्यातील पर्यटन व्यवसाय येथील समुद्र किनार्यापुरताच मर्यादित न ठेवतां त्याचा सर्वकश विस्तार करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, राज्यातील वारसा स्थळांचे सुशोभिकरण करण्याबरोबरच ती पुढील पीढीसाठी सुरक्षित ठेवणे सरकारचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. गोवा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास ध्यानात घेत येथील रुपांतरीत आग्वाद किल्याचा ताबा कुठल्याही खाजगी संस्थेकडे न देतां सरकारचा त्यावर पुर्णपणे ताबा असणे आवश्यक असल्याचे मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी सांगितले. तथापि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याला तसा शब्द दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गोवा पर्यटक महामंडळाचे अध्यक्ष तसेच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT