Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, कारचालक पोलिसांच्या ताब्यात!

Goa Accident: राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. यातच, धर्मापूर येथून अशीच अपघाताची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Goa Accident: राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. यातच, धर्मापूर येथून अशीच अपघाताची घटना समोर आली आहे. कारच्या धडकेत एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. अल्फेड अफोन्सो असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कारच्या धडकेत अल्फेड अफोन्सो गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मडगाव हद्दीत हा भीषण अपघात झाला. कारचालक राहुल डिकोस्टा याला मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल हा कुडतरी येथील रहिवासी आहे.

झालं असं की?

दरम्यान, कारचालक राहुल डिकोस्टा केळशीहून कुडतरीच्या दिशेने मारुती सुझुकी स्विफ्ट नंबर GA-O8-E-7551 कारने निघाला होता. त्याची कार भरधाव वेगात होती. याचदरम्यान धर्मापूर येथे बस स्टॉपजवळ रस्ता ओलांडणाऱ्या अल्फेड अफोन्सो या पादचाऱ्याला त्याच्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत अफोन्सो गंभीर जखमी झाले.

अफोन्सो यांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. कारचालक राहुल याच्या विरोधात मडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. तसेच, पोलिस या अपघाताच्या घटनेचा कसून तपास करतायेत असे मडगाव पोलिसांकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी, मोले कासावली येथे बस, ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला होता. या घटनेत ट्रक चालक जागीच ठार झाला होता तर बसमधील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. सायंकाळच्या सुमारास बसने ट्रकला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK Live Updates: भारताला दुसरा झटका

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

India vs Pakistan: सुरुवातच डगमगली! अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद; सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर फसला VIDEO

VIDEO: "गोव्यात ओला-उबरला का अडवता?" कॉमेडियनच्या रोखठोक प्रश्नावर टॅक्सी चालकाचं 'लय भारी' उत्तर! व्हिडिओ होतोय व्हायरल

"आता वेळ आलीय!" गोमंतकीयांच्या दुहेरी नागरिकत्वासाठी विजय सरदेसाईंची दिल्ली दरबारी सर्वात मोठी मागणी; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT