टोंक-सारमानस (Tonk-sarmanas) जलमार्गावरील फेरीबोटीतून (Ferryboat) प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक मांडवी नदीत (Mandvi river) बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: सारमानस धक्क्यानजीक फेरीबोटीतून पडल्याने एकजण बुडाला

नदीत बुडाल्याने दुर्दैवी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, सारमानस फेरीधक्क्यापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: टोंक-सारमानस (Tonk-sarmanas) जलमार्गावरील फेरीबोटीतून (Ferryboat) प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक मांडवी नदीत (Mandvi river) बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सारमानस फेरीधक्क्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. नामदेव फडते गावकर (वय-70) असे नदीत बुडाल्याने दुर्दैवी ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, ते अडकोण-बाणस्तारी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. सारमानस फेरीधक्क्यापासून फेरीबोट काही अंतरावर असताना नामदेव फडते गावकर हे अचानक नदीत पडले आणि बेपत्ता झाले. उतरण्याच्या घाईगडबडीत की अन्य कारणामुळे ते पाण्यात पडले, ते समजू शकले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेताना रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या नामदेव फडते गावकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. नंतर शोधमोहीम थांबाविण्यात आली.

यासंबधीची माहिती अशी की, नामदेव फडते गावकर हे टोंक येथून फेरीबोटीतून सारमानसला येत होते. सारमानस फेरीधक्क्यावर त्यांचे एक सहकारी वाट पाहत थांबले होते. दोघेही मिळून अध्यात्मिक कार्यक्रमाला जाणार होते. अशी माहिती मिळाली आहे. नामदेव हे अचानक नदीत बुडाल्यानंतर फेरीबोटीतील इतर प्रवाशांनी आरडाओरड केली, तेव्हा फेरीबोट मागे घेण्यात आली. तोपर्यंत नामदेव हे पाण्यात गायब झाले.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी बेपत्ता नामदेवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT