Nuwe
Nuwe Dainik Gomantak
गोवा

Goa: नुवेत कापलेले झाड पडून 25 वर्षीय युवक ठार

Manish Jadhav

मडगाव: रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे कापताना रस्त्यावर लोकांना सतर्क करण्यासाठी कुणी न ठेवण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याने (Public Works Department) केलेली चूक एका 25 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली. हे झाड कापताना त्याचवेळी आपल्या बाईक वरून जात असलेल्या रिचर्ड कॉस्ता (Richard Costa) या युवकावर पडल्याने तो त्याखाली चिरडून जागीच ठार झाला.

ही दुर्घटना सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली. या दुर्घटनेमुळे स्थानिक लोक सतंप्त होऊन रस्त्यावर जमा झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाचा जीव गेल्याने या खात्याच्या अधिकाऱ्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याखाली त्वरित अटक करा अशी मागणी हा जमाव करत होता.

रात्री उशिरपर्यत त्यामुळे या भागात तणावाची स्थिती होती. त्यामुळे पोलिसांनाही तिथे तैनात करण्यात आले होते. सदर युवक खलाशी म्हणून काम करत होता. मात्र कोविडमुळे जहाजे बंद झाल्याने तो सध्या घरीच होता अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT