Crime
Crime Dainik Gomantak

Goa: 'अल्पवयीन' मुलीवरील बलात्कार प्रकरणी पोलिस चौकशीला गती

परशुराम गोमंतक सेना, राष्ट्रीय हिंदू महासभा, शिवसेना महिला आघाडी आदी सामाजिक संघटनांनी सोमवारी डिचोली पोलिस (Dicholim Police) ठाण्यावर धडक दिली होती.
Published on

डिचोली: अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आणखी काहीजण गुंतले असल्याचा दावा सामाजिक संघटनांनी (Social organizations) केल्यानंतर या प्रकरणी डिचोली पोलिसांनी (Dicholim Police) त्यादिशेने तपास सुरु केला आहे. या प्रकरणात अन्य काहीजण गुंतल्याचा दावा करीत परशुराम गोमंतक सेना, राष्ट्रीय हिंदू महासभा, शिवसेना महिला आघाडी आदी सामाजिक संघटनांनी सोमवारी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक दिली होती.

Crime
Goa: डिचोली बलात्कार प्रकरणातील संशयितांना अटक करा; सामाजिक संघटना आक्रमक

अन्य संशयितांना अटक करा. अशी मागणी या संघटनांच्या प्रतिनिधींनी करून काही संशयितांची नावे पोलिसांना दिली आहेत. मात्र या प्रकरणात आणखी काहीजण गुंतले की नाही, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, पिडीत मुलीच्या जबानीनंतरच या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी पिडीत मुलीची दंडाधिकाऱ्यांसमक्ष जबानी होणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com