Goa: Inauguration of the event Dainik Gomantak
गोवा

Goa: डेंग्‍यूविरोधात मुरगाव तालुक्‍याची वज्रमूठ

Goa: पंचायती एकवटल्‍या : आरोग्‍य अधिकाऱ्यांशी घेतली संयुक्त बैठक, समन्‍वयावर भर

Santosh Kubal

दाबोळी : डेंग्यू, मलेरिया व इतर विषाणूजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा व एकमेकांशी समन्वय ठेवण्याचा निर्णय मुरगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सचिव आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. मुरगावचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक यांनी डेंग्यू व इतर आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायती सर्व आरोग्य केंद्रांना पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन दिले. मुरगाव तालुक्यात डेंग्यूने डोके वर काढल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत. याप्रकरणी योग्य ती उपाययोजना व जागृती करण्यासाठी मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष, नगरसेवक व आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेतली होती. तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच यांचीही बैठक घेण्याचे ठरविले होते. तालुक्‍यातील दहा पंचायतींचे सरपंच, सचिवांसाठी डेंग्यू रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यासंबंधी बैठकीचे आयोजन चिखली पंचायतीच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य खात्याच्या रोगनियंत्रण कार्यक्रमाच्या राज्य प्रमुख डॉ. कल्पना महात्मे, गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स, कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सुकोर क्वाद्रोज, चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक व इतर मान्‍यवर उपस्थित होते.

डॉ. क्वाद्रोज यांनी डेंग्यूसंबंधी सादरीकरण करताना मुरगाव तालुक्‍याच्‍या विविध गावांमधील घरांमध्ये डासांचा कसा शिरकाव होतो, त्‍यानंतर कसा प्रसार होतो यासंबंधी योग्य माहिती दिली. डेंग्यूविरोधातील लढाईत समाजाचा पाठिंबा व पंचायतींच्या सहभागावर त्यांनी भर दिला. डॉ. कल्पना महात्मे यांनी शहर आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर आरोग्य केंद्रामार्फत संपूर्ण गोव्यामध्ये डेंग्यू, मलेरिया प्रसाराचा सामना करण्यासाठी स्वीकारलेल्या रणनीती स्पष्ट केल्या. सार्वजनिक आरोग्य कायदा १९८५ व नियम १९८७च्या विविध कलमांवर प्रकाश टाकून ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे असेही आवाहन केले.
लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्‍वाचा
कचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणी, स्वच्छता, जैवविविधता व्यवस्थापन यासंबंधी विविध पंचायतस्तरीय समित्यांच्या भूमिकेवर गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी प्रकाश टाकाला. तसेच डेंग्यू व इतर आजारांचा सामना करण्यासाठी नागरिकांकडून साहाय्य मिळाले असे सांगून पंचायतींना व्हेक्टर जनित रोग नियंत्रणासाठी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी वाटप करण्याची गरज व्यक्त केली. प्रभाग लोकप्रतिनिधींनी बांधकाम स्थळांना भेटी द्यावात, डासांची पैदास स्थळे शोधावीत, कंत्राटदारांना आरोग्यकार्ड घेण्यासंबंधी प्रोत्साहित करावे, रिकामी घरे, बेवारस वाहने यांसंबंधी आरोग्य केंद्रांना माहिती द्यावी, नियमितपणे सामुदायिक स्वच्छता मोहीम आखावी, असेही आवाहन केले.

डेंग्‍यू, मलेरिया आदी साथींचे आजार रोखण्‍यासाठी एकत्रित प्रयत्‍न आणि समन्‍वयाची गरज आहे. पंचायती आणि आरोग्‍य अधिकारी यांनी याबाबत एकमेकांच्‍या संपर्कात राहून स्‍थितीचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे. दोन्‍हींकडून सामूहिक प्रयत्‍न झाले तर या आजारांना आळा घालणे सहज शक्‍य आहे. लोकांचेही सहकार्य तेवढेच अपेक्षित आहे.
- प्रसिद्ध नाईक, मुरगावचे गटविकास अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

SCROLL FOR NEXT