Goa: Slaughter of coconut trees
Goa: Slaughter of coconut trees Dainik Gomantak
गोवा

Goa: बेकायदा बांधकाम पाडले बंद

Santosh Kubal

आगोंद : पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र असलेल्या काब-द-राम किल्ल्याच्या परिसरात सीआरझेड (CRZ) कायद्याचे उल्लंघन करून सुरू केलेल्या बेकायदा (Illegal) बांधकामाविरोधात दै. ‘गोमन्‍तक’ने आवाज उठविल्यावर काणकोणचे मामलेदार विमोद दलाल (Vimod Dalal) यांनी त्याची त्वरित दखल घेत काम बंद करण्याचा आदेश (Order) जारी केला. काणकोण येथील अनिश पाणीकर यांनी हे बांधकाम सुरू केले होते. या जागेत एक शॅक्‍स आणि १४ कॉटेजीस्‌ उभारण्याचा त्यांचा इरादा होता. अस्थाई स्वरूपाचे बांधकाम करण्यास त्यांना तेथे सीआरझेड अधिकारणीने परवाना दिला असला तरी हे बांधकाम करताना स्थानिक खोल पंचायतीला (Khola Panchayat) अंधारात ठेवल्‍याची माहिती मिळाली आहे.

सीआरझेड अधिकारिणीने या जागेत शॅक्‍स उभारण्यास परवानगी दिली असली तरी हे बांधकाम लाकूड आणि इतर बायो-डिग्रेडेबल साहित्य वापरून करावे असे स्पष्टपणे म्हटले आहे. असे असताना लोखंडी खांबांवर पॅनल उभारून हे बांधकाम सुरू केले होते. तसेच वरील छपरासाठी सिमेंटचे पत्रे वापरण्याची तयारी केली होती असे आज मामलेदार कार्यालयातील तलाठ्याने केलेल्या पाहणीत दिसून आले. शिवाय इतर कुठल्याही नैसर्गिक वस्तूंमध्ये फेरफार न करण्याची महत्त्वाची अट घातलेली असताना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची वाट तयार करण्यासाठी असंख्य माडांची कत्तल केल्याचेही दिसून आले. मामलेदार दलाल यांनी सदर घटनेचा अहवाल उपजिल्हाधिकारी नीलेश धायमोडकर यांना सादर केला व पाणीकर यांना तत्काळ काम थांबवण्याचा आदेश आज जारी दिला. आता लवकरच विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपासणी केली जाणार असून त्यानंतर या समितीचा अहवाल सीआरझेड अधिकारिणीकडे पाठविण्यात येणार आहे.

मालकाला नोटीस बजावणार : सरपंच

खोलाच्‍या सरपंच पूर्णा नायक यांनी पंचायत सचिव दामोदर काणकोणकर व स्थानिक पंचाच्‍या उपस्थितीत आज सोमवारी या बेकायदा बांधकामाची पाहणी केली. या बांधकामाविरोधात मालकाला लचकरच पंचायत नोटीस बजावणार असल्याचे नायक यांनी प्रस्‍तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पंचायतीला अंधारात ठेवून हे काम करण्‍यात येत होते. सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटामुळे या कृत्‍याला वाचा फुटली. पाहणीवेळी बांधकामस्‍थळी कोणीच व्यक्ती उपस्थित नसल्यामुळे चौकशी करता आलेली नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT