Goa : Cancona Palika Garden. Dainik Gomantak
गोवा

Goa : झोपाळे, घसरगुंडी गंजलीय, वाढली झुडपे

Goa : काणकोण पालिकेचे देखभालीकडे दुर्लक्ष : पोर्तुगीजकालीन उद्यानाला अवकळा

Mahesh Tandel

काणकोण : काणकोण पालिकेच्या (Cancona Palika) पोर्तुगीजकालीन उद्यानाला (Garden) अवकळा आली आहे. या उद्यानाच्या देखभालीकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. काही वर्षे या उद्यानाची देखभाल काणकोणमधील पंचतारांकित हॉटेलतर्फे (Five Star Hotel) करण्यात येत होती. यापूर्वी या उद्यानात शोभेच्या झाडांची लागवड, विद्युत रोषणाई, तसेच नियमीत देखभाल हॉटेल अस्थापनातर्फे करण्यात येत होती. मात्र, गेली दोन वर्षे हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे.

सध्‍या गेल्या वर्षापासून कोविड महामारीमुळे उद्यान बंद आहे. देखभालीअभावी उद्यानात झाडी वाढली आहे. उद्यानात माणसांचा वावर नसल्याने बेडूक व त्यांना भक्ष्य बनवण्यासाठी सापांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उद्यानातील झाडे व गवत कापून साफसफाई करण्याची गरज चावडी येथील शंकर नाईक यांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी वीज तारांवर लोंबकळणाऱ्या झाडांची छाटणी करून घेतली होती. त्यापूर्वी या झाड्यांच्‍या फांद्याचे वीज तारांना घर्षण होऊन वारंवार या भागाचा वीजपुरवठा खंडित होत होता. उद्यानात बालकांसाठी झोपाळे, घसरगुंडी व अन्य सोयी आहेत. मात्र, त्याची देखभाल होत नसल्याने त्यांना गंज चढला आहे.

उद्यानाचे लवकरच नूतनीकरण
चावडी येथील उद्यान पोर्तुगीजकालीन आहे. त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंदर्भात पालिका मंडळाने ठराव समंत केला आहे. हा प्रस्ताव जीसुडा यंत्रणेला पाठवून त्याच्या योजनेतून उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT