Goa पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांची घोषणा.. Dainik Gomantak
गोवा

लवकरच उभारणार 48 कोटींचा ‘मांद्रे ग्राम मनोरंजन’ प्रकल्प..

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांची घोषणा..

दैनिक गोमन्तक

पर्यटन विकास महामंडळामार्फत (Tourism Development Corporation) राज्यात एकूण 470 कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प पूर्ण केले असून, काही प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता नव्याने 100 कोटी रुपये खर्च करून काम करण्यासाठी प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 48 कोटी रुपये खर्च करून लवकरच ‘मांद्रे ग्राम मनोरंजन’ प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा गोवा पर्यटन (Goa Tourism) विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे (President Dayanand Sopte) यांनी केली.

तुये येथील श्री भगवती मंदिर परीसराचे पर्यटन विकास महामंडळातर्फे 3 कोटी 36 लाख रुपये खर्च करून शुशोभीकरण करण्यात येणार आहे. नियोजित कामाच्या शुभारंभप्रसंगी सोपटे बोलत होते. यावेळी देवस्थान अध्यक्ष तथा सरपंच सुहास नाईक, पंच किशोर नाईक, कविता तुयेकर, माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, पार्से भगवती देवस्थानचे अध्यक्ष साबा सायेब देसाई, आनंद प्रभुदेसाई, जयराम नाईक, माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, हरमलचे पंच अनंत गडेकर उपस्थित होते.

सोपटे यांनी सांगितले की, मांद्रे मतदारसंघातील एकूण नऊही पंचायत क्षेत्रातील प्रमुख देवस्थान, ग्रामदेवता, मंदिरांचे शुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. उर्वरित विर्नोडा व हरमल या दोन देवस्थानचे शुशोभीकरणही केले जाईल. ज्यांनी मला आमदार बनवले त्या मतदारांची कामे करण्यासाठी आणि सेवेसाठी तप्तर असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या सहकार्यातून केंद्राकडून आता पर्यटन विकास महामंडळा 100 कोटी रुपये निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मांद्रे जुनासवाडा येथील 1 लाख 30 हजार चौरस मीटर सरकारी जागेत ‘मांद्रे ग्राम मनोरंजन’ प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात पार्किंग, पंचतारांकित हॉटेल. कोटेजीस, चिल्ड्रन पार्क, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलिशान सभागृह यांचा समावेश आहे. या सर्व सोयींयुक्त प्रकल्पामुळे स्थानिकांनाही यात रोजगार मिळेल. मांद्रे मतदारसंघ हा लोकोपयोगी ठरावा, तसेच स्थानिकांनाही त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने या प्रकल्पाद्वारे मांद्रेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणार असल्याचे आमदार सोपटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT