पणजी (Panjim) मार्केट Market) टेनंट असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी अनेक गाळ्यांवर कब्जा केला असून ते भाडेपट्टीवर दिले आहेत. त्यामुळे या असोसिएशनला पणजी महापालिकेने(Panaji Municipal Corporation) ‘लिव्ह अँड लायन्सन्स’करारासाठी सुरू केलेली प्रक्रिया नको आहे, असा आरोप पणजी महापालिका मार्केट समितीचे अध्यक्ष प्रमेय माईणकर यांनी केला.
पणजी महापालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत (press conference) ते म्हणाले की, महापालिकेच्या अनेक मार्केट समित्या झाल्या. मात्र, त्यांनी ‘लिव्ह अँड लायन्सन्स’ करारासाठी प्रयत्न केले ते अर्ध्यावरच सोडून दिले. गेली अनेक वर्षे पणजी मार्केट टेनंट असोसिएशनचे पदाधिकारी तेच आहेत. या पदाधिकाऱ्यांचे अनेक गाळे या मार्केटात असून ते भाडेपट्टीवर देण्यात आले आहे. पणजी मार्केट मालमत्ता ही पणजी महापालिकेची असून हे गाळे व्यापाऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात आलेले असताना पुन्हा ते उपभाडेकरूला कसे काय देण्यात आले आहेत? असा प्रश्न त्यांनी केला. ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. ‘लिव्ह अँड लायन्सन्स’ करारासाठी आतापर्यंत सुमारे 20 अर्ज आले आहेत, त्यापैकी एका अर्जाबाबत करार झाला आहे. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे.
नवे पणजी मार्केटमधील गाळेधारकांची माहिती गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या यादीनुसार तपासली जात आहे. मार्केटातील काही व्यापाऱ्यांना ‘लिव्ह अँड लायन्सन्स’ करार करायचा आहे. मात्र, या असोसिशएनचे पदाधिकारी त्यामध्ये अडथळा आणत आहेत. महापालिकेच्या मार्केट समितीने या गाळेधारकांची सविस्तर माहिती तपासण्यास सुरवात केली आहे, असे माईणकर म्हणाले.
या तपासणीस गाळे वितरणामध्ये गुंतलेल्या काही आजी - माजी नगरसेवकांचा पर्दाफाश होऊ शकतो. ‘लिव्ह अँड लायन्सन्स’ करारासाठी अनेकदा मार्केट व्यापाऱ्यांना अनेक मुभा तसेच सवलती देण्यात आल्या. मात्र, कोणीही पुढे येण्यास तयार नाही. जे कोणी इच्छुक आहेत त्यांना अडथळे आणले जात आहेत, असे माईणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.