Goa : Vasco: Deputy Collector of Murgaon Dattaraj Desai giving guidance in a meeting on law and order on the occasion of Shri Damodar Bhajani Week. Dhirendra Banavalikar, the case officer, Prashant Joshi, Santosh Khorjuvekar and others on the management committee. Dainik Gomantak
गोवा

Goa : दामोदर भजनी सप्‍ताह साधेपणाने

Goa : उपजिल्‍हाधिकाऱ्यांकडून निर्देश : पोलिस बंदोबस्‍तही ठेवणार

Mahesh Tandel

दाबोळी : १४ व १५ ऑगस्ट रोजी होणारा वास्को येथील श्री दामोदर भजनी सप्ताह (Shree Damodar Bhajani Festival) दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाद्वारे (Dy. Collector Order) सर्वसाधारणपणे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी दिली. सप्ताह दिनी कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिरात व बॅरिकेट घातलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयात श्री दामोदर भजनी सप्ताहाविषयी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात शुक्रवारी (ता.६) बैठक उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी बैठकीत मुरगावचे मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर, वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक सुरेश नार्वेकर, उपनिरीक्षक प्रज्योती देसाई, मुरगाव नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध पवार, सॅनेटरी निरीक्षक महेश कुडाळकर, वास्को आरोग्य केंद्राच्‍या डॉ. अनुराधा सूर्यवंशी, अव्वल कारकून नीलेश साळगांवकर, श्री दामोदर भजनी सप्ताह व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रशांत जोशी, सचिव संतोष खोर्जुवेकर, सदस्य विनायक घोंगे, उत्सव समितीचे खजिनदार विष्णू गारुडी व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री दामोदर भजनी सप्ताह गेल्यावर्षीप्रमाणे कोविड-१९ महामारीमुळे सरकारने लागू केलेल्या नियमानुसार साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी दिली.

ओळखपत्र दिलेल्‍या सदस्‍यांनाच प्रवेश
श्री दामोदर भजनी सप्ताह समितीतर्फे मंदिरात उत्सवावेळी समितीतर्फे ओळखपत्र दिलेल्या सदस्यांना प्रदेश प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती सचिव संतोष खोर्जुवेकर यांनी दिली. यात भजन सादर करणारे कलाकार, जोशी कुटुंब असणार असल्याची माहिती दिली. तसेच सप्ताहदिनी मंदिरात येणारी पार समिती दुपारी तीन वाजल्यानंतर एक तासाच्या अंतराने येणार असल्याची माहिती खोर्जुवेकर यांनी दिली. वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी वाहतुकीची पूर्ण व्यवस्था गेल्या वर्षीप्रमाणे करण्यात येणार असल्याचे सांगितले. १४ ऑगस्ट रोजी सप्ताहानिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मुरगाव नगरपालिकेतर्फे गेल्यावर्षी प्रमाणे पत्र्याचे बॅरिगेट्‍स उभारण्यात येईल. सप्ताह समितीने मंदिरात येणाऱ्या भजनी कलाकारांचे ओळखपत्राची माहिती पोलिसांना देण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.

वाहतूक नियंत्रण व्‍यवस्‍था
१४ ऑगस्ट रोजी सप्ताह असल्याने १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वतंत्रपथ मार्ग, रेल्वे स्टेशन ते ठक्कर हाऊस पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देसाई यांनी दिली. येत्या १० ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी देसाई, वास्को पोलिस, उत्सव समितीतर्फे संयुक्तरित्या श्री दामोदर भजनी सप्ताह निमित्त पाहणी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT