37th National Games 2023 Dainik Gomantak
गोवा

37th National Games 2023: 'हा' निकष पाळल्यास उद्‍घाटन समारंभाला 100 शाळांना उपस्थित राहता येणार

26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील स्टेडियममध्ये सायंकाळी 4.30 वाजता स्पर्धेचा उद्‍घाटन समारंभ होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games 2023 गोव्यात होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन समारंभास उपस्थित राहण्याची संधी राज्यातील प्रथम नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर शाळांना मिळणार आहे.

26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सायंकाळी 4.30 वाजता या स्पर्धेचा उद्‍घाटन समारंभ पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल. विद्यार्थिनी असतील, तर महिला शिक्षिकांना उपस्थित राहता येईल.

उद्‍घाटन समारंभापूर्वी चार वाजता स्टेडियमस्थळी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांसह माहिती देणे बंधनकारक आहे. या ठिकाणी ये-जा करण्यासाठी बालरथाचा वापर करता येऊ शकतो, असे शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगडे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

या परिपत्रकाची प्रत सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या प्रमुखांना पाठविण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण क्रीडानगरी

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की कांपालची क्रीडानगरी चार-पाच दिवसांत उभी राहील. ही एक नाविन्यपूर्ण क्रीडानगरी असेल. या क्रीडानगरीस लोकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. क्रीडानगरीमुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कांपाल ते मिरामार परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस विभागाला योग्य नियोजन करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT