Akanksha Salunkhe  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: स्पर्धेसाठी खास अमेरिकेहून दाखल आकांक्षाचे स्क्वॉशमध्ये पदक निश्चित

स्पर्धेसाठी अमेरिकेतून दाखल: तमिळनाडूच्या पूजा हिच्याविरुद्ध सुवर्णपदकासाठी लढत

किशोर पेटकर

37th National Games गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी खास अमेरिकेहून आलेल्या आकांक्षा साळुंखे हिने विश्वास सार्थ ठरविताना महिलांत अंतिम फेरी गाठली, त्यामुळे रविवारी यजमानांच्या खाती सुवर्ण किंवा रौप्यपदकाची भर पडणार हे निश्चित.

चिखली-वास्को येथील क्रीडा संकुलात स्क्वॉश स्पर्धा सुरू आहे. आकांक्षाने शनिवारी उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या ऊर्वशी जोशी हिला 3-0 (11-7, 11-9, 11-1) अशा फरकाने नमविले. तमिळनाडूची पूजा आरती हिच्याविरुद्ध आकांक्षाची सुवर्णपदकासाठी लढत होईल. पूजा हिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर 3-0 (11-6, 11-8, 11-8) अशी मात केली.

राष्ट्रीय पातळीवर ज्युनियर स्क्वॉशमध्ये गोव्यातर्फे सातत्यपूर्ण कामगिरी केलेली 24 वर्षीय आकांक्षा सध्या न्यूयॉर्कमध्ये स्क्वॉशचे प्रशिक्षण घेते, तसेच तेथे खेळतही आहे.

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकांक्षाने गोव्यातर्फे खेळावे यासाठी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी खास निमंत्रण दिले होते, त्यास मान देऊन ती स्पर्धेसाठी अमेरिकेहून दाखल झाली आणि आता अंतिम फेरी गाठून गोव्याचे पदक निश्चित केले.

स्पर्धेतील सहभागासाठी तिला गोवा असोसिएशन ऑफ स्क्वॉशचे अध्यक्ष पंकज जोशी यांचे सहकार्य लाभले.

वुशू खेळात गोव्याला तिसरे पदक

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी गोव्याला वुशू खेळात रौप्यपदक मिळाले. राज्याला या खेळात मिळालेले हे दुसरे सुवर्ण, तर एकंदरीत तिसरे पदक ठरले.

पुरुषांच्या तोऊलो प्रकारात शेरबहादूर रौप्यपदकाचा मानकरी ठरला. यापूर्वी वुशू खेळात गोव्यासाठी रोशन कारकी याने रौप्य, तर जनिव्हा फर्नांडिस हिने ब्राँझपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT