पणजी : महागाईच्या काळात लोकांना दिलासा देताना ‘मळ्यातलो झरीकार’ मळा - पणजी (Mala Panjim) येथील संस्थेतर्फे गतवर्षीप्रमाणे यंदाही वाजवी दरामध्ये (Reasonable Rates) शाडू मातीच्या गणेश मूर्ती (Ganesh Murti) उपलब्ध केल्या आहेत. इतरत्र अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत दर असलेल्या दोन फुटाच्या सात्विक गणेशमूर्ती अवघ्या ९०० रुपयांमध्ये ‘मळ्यातलो झरीकार’ संस्थेने उपलब्ध केल्या आहेत.
या संस्थेचे प्रमुख सूरज कांदे तसेच माजी नगरसेविका रेखा कांदे यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी गत वर्षीपासून हा उपक्रम सुरू केला आहे. महागाईच्या काळात लोकांना दिलासा मिळावा व राज्यातील कलाकारांच्या मूर्ती गोवाभर जाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याचे सूरज कांदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
भाविकांचा प्रतिसाद
दोन दिवसापूर्वी उपक्रम सुरू केल्यानंतर आतापर्यंत शंभर मूर्ती विकल्या गेल्या आहेत. २५० मूर्ती लोकांना उपलब्ध करण्याचे आपले ध्येय असल्याचे सूरज कांदे यांनी सांगितले. सध्याचा काळ हा महागाईचा आहे. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना गणेश चतुर्थी सण साजरा करताना बरीच कसरत करावी लागत आहे. गतवर्षीही कोरोनाचा काळ होता आणि यंदाही तसेच वातावरण असल्यामुळे कोरोना महामारीत आर्थिक बाजू कमजोर झालेल्या तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी कमी दरामध्ये श्रीगणेशाच्या सात्विक मूर्ती आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत.
संस्थेद्वारे सामाजिक बांधिलकी
मळ्यातलो झरीकार ही संस्था अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. परिसरातील खेळाडूंसाठी विविध स्पर्धा व महिला व मुलींसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी गणेश चतुर्थीला सात्विक मूर्ती किफायतशीर दरात उपलब्ध करण्यात येत आहेत, असे सूरज कांदे यांनी सांगितले.
राज्यभरातील दर्जेदार सात ते आठ कलाकारांनी तयार केलेल्या मूर्ती मागवून त्या अवघ्या नऊशे रुपयांमध्ये लोकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कांदे यांनी सांगितले. गतवर्षी पहिल्यांदाच उपक्रम आयोजित केल्यानंतर सुमारे १५० गणेश मूर्ती उपलब्ध केल्या होत्या. यंदा २५०चे ध्येय ठेवले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत जर मूर्ती संपल्या तर आणखी मूर्ती उपलब्ध करण्यात येणार आहेत. जागेचा अभाव असल्यामुळे जेवढी मागणी, त्यापेक्षा काहीप्रमाणात अधिक मूर्ती आपण उपलब्ध करणार आहे.
- सूरज कांदे, मळ्यातलो झरीकार संस्थेचे प्रमुख
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.