Goa: Vidyavardhak Mandal member in meeting, In Bicholim, Goa. On Monday, 26 July, 2021. Tukaram Sawant / Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोली शांतादुर्गा विद्यालयासाठी 3 कोटींचा इमारातीचा प्रकल्प

Tukaram Sawant

डिचोली, येथील विद्यावर्धक मंडळ (Vidhyavardhak Mandal) संचालित, श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयासाठी (Shri. Shantadurga High-School, Bicholim) विस्तारीत इमारत प्रकल्प बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी (School Building Project) साधारणतः तीन कोटी रुपये खर्च (3 Crore coast) येणार आहे, अशी माहिती विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विद्यावर्धक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. ही सभा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी मंडळाचे सचिव तथा सभापती राजेश पाटणेकर, उपाध्यक्ष सदाशिव वालावलकर, खजिनदार राजेश धोंड, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजित तेली आदी उपस्थित होते.

सुरवातीला विजय सरदेसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजेश पाटणेकर यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. त्यानंतर चित्रफितीव्दारे मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाईन अध्ययन, गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आदी शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. डॉ. कौस्तुभ पाटणेकर, शिवदत्त शेट्ये, मधुकर पाटणेकर, राघू बोर्डेकर आदींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन विजय सरदेसाई यांनी केले.

प्रकल्पाला 3 कोटी रुपये खर्च

उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सध्याच्या प्रकल्पाला टेकूनच वाणिज्य, कला आणि व्यावसायिक विभागासाठी विस्तारीत इमारत बांधण्यात येणार आहे.पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यावर 3 कोटी रुपये खर्च येणार आहे. विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT