Goa: फोंडा विद्युत खात्याची अभूतपूर्व कामगिरी

१२ तासांत तब्बल ३० ट्रान्सफॉर्मर सुरू करून वीज पूर्ववत
Ponda Goa Electric Department Work Fast
Ponda Goa Electric Department Work Fast Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गेले चार दिवस (Goa State) सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे (Heavy Rain) फोंडा, (Ponda) धारबांदोडा (Dharbandoda) तालुक्यातील अनेक ठिकाणी जलप्रलय झाला. (Flood) विशेषत: खांडेपार, (Khandepar) धारबांदोडा, गांजे, (Gange) कोडार (Kodar) अशा भागांत पुराचे पाणी रस्त्यांवर पुलावर आले. यामुळे मुख्यत: हानी झाली ती विद्युत खात्याची. (Power Suplay Stop) या भागातील ३० ट्रान्सफॉर्मर पाण्यामुळे बंद झाले. मात्र, वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्व शक्ती पणाला लावत १२ तासांत तब्बल ३० ट्रान्सफॉर्मर सुरू केले. (Electric Department) शुक्रवारी आणि शनिवारी या खात्याचे सर्व अधिकारी, अधीक्षक अभियंता स्टीफन, (Stifen) कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत (Vallabh Samant) हे सर्वजण विविध ठिकाणी जाऊन साहाय्यक, कनिष्ठ अभियंता, लाईन स्टाफ यांना मार्गदर्शन करत होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी काम, तेही कमी अवधीत करण्यात अनेक अडचणी होत्या. पुराच्या पाण्यात होडी घालून कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते.

Ponda Goa Electric Department Work Fast
Goa: नार्वेत झाड कोसळल्याने तीन घरांची मोडतोड; अनर्थ टळला

आवश्यक तिथे साहित्य वाहनाने पुरवताना पुन्हा एकदा या खात्याने आपली कार्यक्षमता सिद्ध केली. (Power Suplay Start) कर्मचारी वर्गाने काम कमी वेळेत पूर्ण केले. पाणी कमी होताच म्हणजे सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केवळ १२ तासांच्या अवधीत सगळे ३० ट्रान्सफॉर्मर (Transfarmers) कार्यान्वित केले. यात फोंडा तालुक्यातील (Ponda Taluka) जलवाहिनी म्हणजे ओपा वॉटर वर्क्सशी (Opa Water Work) संबंधित नेटवर्कही दुरुस्त केले. कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने यावेळी जेवणासाठीही न थांबता काम पूर्ण केले. अलीकडेच झालेल्या ‘तौक्ते’ वादळातवेळीही (Taukte) फोंडा विद्युत खात्याने पूर्ण गोव्यात सर्वात आधी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा मान मिळवला होता. सर्व विभागांनी एकमेकांना साहाय्य करून या संकटावर मात केली आणि ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले, असे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत (Vallabh Samant) यांनी संगितले. यासाठी या विभागाचे कौतुक होत आहे.

Ponda Goa Electric Department Work Fast
Goa Politics: राज्य सरकार खूप चांगले काम करत आहे- जे. पी. नड्डा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com