Goa: house Collapse of Sanjay Naik Dainik Gomantak
गोवा

Goa: संजय नाईक यांचे घर जमीनदोस्त

खांडेपार येथे मोठी पडझड (Goa)

Sandeep Survekamble

सावईवेरे ः (Goa-Savoiverem) पावसामुळे आलेल्या पुरात बाझारवडा-खांडेपार (Bazarwada Khandepar) येथील रस्त्याच्या सखल भागात असलेल्या एकूण सात घरांत पुराचे पाणी शिरल्याने येथील कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर आणि पाऊस यामुळे संजय नाईक यांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. (house Collapse) तर निलेश पर्वतकर यांच्या घरात अचानक पुराचे पाणी शिरल्याने घरातील बहुतेक सर्वच वस्तू पाण्यात वाया गेल्या. घरातील फ्रिज, (Refrigerate) टी. व्ही., (T. V.) मिक्सर, (Mixer) विजेच्या वस्तू (Electric Items) खराब होण्याबरोबरच भांडी, कपडे, अंथरूण व अन्य वस्तू पुराच्या पाण्यात सापडल्या. संजय नाईक यांचे कुटुंब शांतादुर्गा देवस्थान जवळील त्यांच्या नातेवाईकांकडे राहू लागले आहेत. तर नीलेश पर्वतकर यांचे कुटुंब दिवसा घरात तर रात्री दोन तीन दिवस मार्शेल येथे सासुरवाडीला राहत आहेत.

विठ्ठल खांडेपारकर, परेश नागेशकर, प्रभाकर नाईक, प्रकाश नाईक यांच्या घरात पावसाचे पाणी आल्याने घरातील अनेक वस्तू, कपडे, पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. कुर्टी-खांडेपारचे तलाठी प्रसाद बोरकर यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT